GK : जगात सर्वाधिक कर्ज कोणत्या देशावर, यादीमध्ये भारत कितव्या स्थानी?

आजघडीला अनेक देशावर कोट्यवधी डॉलर्सचे कर्ज आहे. भारतावरही बरेच कर्ज आहे. कर्ज असणाऱ्या या देशांच्या यादीत भारत कितव्या स्थानावर आहे, हे जाणून घ्या.

| Updated on: Jan 30, 2026 | 12:20 AM
1 / 5
जानेवारी 2026 च्या डेटानुसार तसेच आर्थिक सर्वेक्षण 2025-26 नुसार अनेक मोठ्या अर्थव्यवस्था आजघडीला कर्जाच्या ओझ्याखाली दबल्या आहेत. युद्धामुळे, वाढत्या जनसंख्येमुळे, योजनांवरील खर्चामुळे अनेक देशांची अर्थव्यस्था राजकोषीय तुटीत आहेत. अशा स्थितीत कोणत्या देशावर किती कर्ज आहे, असे विचारले जात आहे.

2 / 5
भारत यात कोणत्या स्थानावर आहे, याबाबतही विचारणा होत आहे. अमेरिका या देशावर इतर देशांच्या तुलनेत सर्वाधिक कर्ज आहे. या देशावर साधारण 38.3 ट्रिलियन डॉलर्स कर्ज आहे. सैन्यावरचा खर्च, कल्याणकारी योजना यावर होणाऱ्या अतिरिक्त खर्चामुळे या देशाला कर्ज घेण्याची वेळ वारंवार येते.

3 / 5
कर्जाच्या बाबतीत चीन दुसऱ्या स्थानावर आहे.  चीनवर एकूण 18.7 ट्रिलियन डॉलरचे कर्ज आहे. पायाभूत सुविधांवरील खर्च आणि आर्थिक प्रोत्साहनपर योजनांमुळे चीनवर एवढं कर्ज घेण्याची वेळ आलेली आहे. कर्जाच्या बाबतीत जपान हा देश तिसऱ्या  स्थानावर आहे.

4 / 5
या देशावर एकूण 9.8 ट्रिलियन डॉलर सरकारी कर्ज आहे.  ब्रिटन म्हणजेच युनायडेट किंग्डम हा देश कर्जाच्या बाबतीत चौथ्या स्थानावर आहे. या देशावर एकूण 4.1 ट्रिलियन डॉलर सरकारी कर्ज आहे.

5 / 5
 तर फ्रान्स या देशावर 3.9 ट्रिलियन डॉलर सरकारी कर्ज असून हा देश पाचव्या स्थानावर आहे. कर्जबाजारी देशांच्या यादीत इटली हा देश सातव्या स्थानी असून या देशावर 3.5 ट्रिलियन डॉलर कर्ज आहे. कर्जाच्या बाबतीत भारत सहाव्या स्थानावर आहे. भारतावर 3.8 ट्रिलियन डॉलरचे कर्ज आहे.