Shefali Jariwala Death : ज्या एका गाण्यामुळे शेफाली रातोरात स्टार झाली, त्यासाठी तिला मिळालेले फक्त इतके पैसे

Shefali Jariwala Song Fee : कांटा लगा गर्ल शेफाली जरीवालाच हार्ट अटॅकने निधन झालं. 'कांटा लगा' या एका गाण्याने तिला रातोरात प्रसिद्धी मिळवून दिली. इंडस्ट्रीमध्ये तिची चर्चा सुरु झाली. पण म्युझिक अल्बममधल्या या व्हिडिओसाठी तिने किती पैसे घेतलेले हा फार कमी जणांना माहित आहे.

| Updated on: Jun 28, 2025 | 9:31 AM
1 / 5
एक गाणं कोणाचं नशीब पालटू शकतं....यावर विश्वास ठेवणं भले कठीण असेल, पण या इंडस्ट्रीमध्ये असे अनेक स्टार्स आहेत, जे आपल्या करिअरमध्ये एका गाण्याच्या लोकप्रियतेसाठी ओळखले जातात. अशीच एक स्टार होती, शेफाली जरीवाला. आता ती आपल्यामध्ये नाहीय. वयाच्या 42 व्या वर्षी शेफालीच हार्ट अटॅकमुळे निधन झालं.

एक गाणं कोणाचं नशीब पालटू शकतं....यावर विश्वास ठेवणं भले कठीण असेल, पण या इंडस्ट्रीमध्ये असे अनेक स्टार्स आहेत, जे आपल्या करिअरमध्ये एका गाण्याच्या लोकप्रियतेसाठी ओळखले जातात. अशीच एक स्टार होती, शेफाली जरीवाला. आता ती आपल्यामध्ये नाहीय. वयाच्या 42 व्या वर्षी शेफालीच हार्ट अटॅकमुळे निधन झालं.

2 / 5

शेफाली जरीवालाच्या निधनाने टीव्ही इंडस्ट्रीला मोठा धक्का बसलाय. शेफाली भले जास्त चित्रपटात दिसली नाही. पण कांटा लगा या गाण्याच्या म्युझिक अल्बमने तिला रातोरात स्टार बनवलं. त्या एका गाण्यासाठी तिला किती मानधन मिळालेलं तुम्हाला माहितीय का?.

3 / 5

शेफाली जरीवालाला 'कांटा लगा' हे गाणं मिळालं. तेव्हा त्यात डान्स करण्यासाठी वडिलांनी स्पष्ट शब्दात नकार दिलेला. त्यावेळी शेफाली कॉलेजला होती. तिने तिच्या अभ्यासाकडे लक्ष द्यावं, अशी तिच्या आई-वडिलांची इच्छा होती. त्यावेळी शेफालीला पैशांसाठी ते गाणं करायचं होतं.

4 / 5

शेफालीने वडिलांच म्हणणं ऐकलं नाही. तिने गाण्यासाठी होकार दिला. शेफाली जरीवालाने एका इंटरव्यू दरम्यान सांगितलं की, कांटा लगाच्या व्हिडिओसाठी तिला त्यावेळी 7000 रुपये मिळालेले.

5 / 5

'कांटा लगा' गाण्यानंतर शेफाली इंडस्ट्रीतून गायब झाली. यामागे आकडीचा आजार हे कारण असल्याच तिने सांगितलं. शूटिंग दरम्यान अचानक आकडी आली तर? ही भिती तिच्या मनात असायची. म्हणून तिने दीर्घकाळ दुसरे प्रोजेक्ट घेतले नाहीत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us