AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video : तब्बल 20 वर्षांपासून बंद होता तुपाचा डबा, झाकण उघडताच दिसलं असं काही की भलेभले थक्क; व्हिडीओची तुफान चर्चा!

हा व्हिडीओ पाहून सगळेच थक्क झाले आहेत. विशेष म्हणजे व्हिडीओमध्ये जे काही दिसलंय ते पाहून अनेकजण चकित झाले आहेत. सोबतच या व्हिडीओत जो दावा करण्यात आलाय, त्यावरही मतमतांतरं व्यक्त केली जातायत.

Video : तब्बल 20 वर्षांपासून बंद होता तुपाचा डबा, झाकण उघडताच दिसलं असं काही की भलेभले थक्क; व्हिडीओची तुफान चर्चा!
ghee viral videoImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 08, 2026 | 9:43 PM
Share

Social Media Viral Video : सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल हे सांगता येत नाही. सध्या सोशल मीडियावर एक अजब व्हिडीओ आला आहे. हा व्हिडीओ पाहून सगळेच थक्क झाले आहेत. विशेष म्हणजे व्हिडीओमध्ये जे काही दिसलंय ते पाहून अनेकजण चकित झाले आहेत. सोबतच या व्हिडीओत जो दावा करण्यात आलाय, त्यावरही मतमतांतरं व्यक्त केली जातायत.

व्हिडीओत नेमकं काय आहे?

सध्या समोर आलेल्या एका व्हिडीओत 20 वर्षांपूर्वीच्या तुपाचा एक डबा दाखवण्यात आलाय. हा डबा तब्बल 20 वर्षांपासून बंद होता, असा दावा करण्यात आलाय. 2006 मध्ये संबंधित व्यक्तीच्या आजोबांचे निधन झाले होते. त्यानंतर त्यांनीच या डब्यात तूप ठवले होते. आता हा डबा उघडण्यात आलाय, असं व्हिडीओ पोस्ट करणाऱ्या राजू शाह नावाच्या व्यक्तीने सांगितलंय. हा व्हिडीओ पाहून आता तूप किती वर्षे टिकू शकते, असे विचारले जात आहे. तर काही नेटकऱ्यांनी व्हिडीओमध्ये दिसणारे तूप नसून ते तुर्कीमधील पारंपरिक ‘तुलुम चीज’ हा पदार्थ असल्याचे अनेकजण सांगत आहेत.

आयुर्वेदात जुन्या तुपाला विशेष महत्त्व

दरम्यान, आयुर्वेदात जुन्या तुपाला ‘पुराण घृत’ असं म्हटलं जातं. 10 ते 15 वर्षे जुने तूप ‘कुंभसर्पि’ म्हणून ओळखले जाते. पारंपरिक आयुर्वेदिक उपचारांमध्ये अशा तुपाचा उपयोग काही औषधे तयार करण्यासाठी केला जात असल्याचे सांगितले जाते. मानसिक आरोग्य, त्वचेचे विकार आणि जखमांवरील उपचारांमध्ये त्याचा उल्लेख आढळतो.

तूप की चीज? नेटकऱ्यांमध्ये दोन गट

दरम्यान, या व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. काहींनी शुद्ध तूप आणि मध योग्य पद्धतीने साठवल्यास दीर्घकाळ टिकू शकतात, असे म्हटले आहे. तर काहींनी व्हिडीओमध्ये दिसणारा पदार्थ तुर्कीचे पारंपरिक ‘तुलुम चीज’ असल्याचा दावा केला आहे. काही युजर्सनी त्यातील दुधाचे घटक पाहून तो तूप नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे व्हिडीओत दिसणारा पदार्थ हा 20 वर्षे जुने तूप असल्याचे अद्याप सिद्ध झालेले नाही किंवा स्वतंत्रपणे त्याची पडताळणीही करण्यात आलेली नाही.

Follow Us
पुण्यात वंचित बहुजन आघाडीची काळी दिवाळी! चटणी-भाकरी खाऊन सरकारचा...
पुण्यात वंचित बहुजन आघाडीची काळी दिवाळी! चटणी-भाकरी खाऊन सरकारचा निषेध, शेतकऱ्यांसाठी अनुदानाची मागणी
सिलसिला बैठकांचा निर्णय विलीनीकरणाचा? पार्थ पवारांची पुन्हा एकदा...
NCP Merger : सिलसिला बैठकांचा निर्णय विलीनीकरणाचा? पार्थ पवारांची पुन्हा एकदा सिल्व्हर ओकवर बैठक
दोन्ही शिवसेना एकत्र... विलीनीकरणाच्या चर्चांबाबत ओमराजे निंबाळकर...
Omraje Nimbalkar : दोन्ही शिवसेना एकत्र... विलीनीकरणाच्या चर्चांबाबत ओमराजे निंबाळकरांचं मोठं विधान
पंतप्रधान मोदींवर बोलताना शिंदे गटातील नेत्याची जीभ घसरली; असं काय...
पंतप्रधान मोदींवर बोलताना शिंदे गटातील नेत्याची जीभ घसरली; असं काय म्हणाले?
दिवाळीच्या मंगलपर्वावर परळी वैजनाथ मंदिरात भाविकांची अलोट गर्दी;
दिवाळीच्या मंगलपर्वावर परळी वैजनाथ मंदिरात भाविकांची अलोट गर्दी; हर हर महादेवचा जयघोष!
नक्षलवाद्यांची आर्थिक कंबर मोडली! मोदींनी सांगितली सरकारच्या कठोर...
नक्षलवाद्यांची आर्थिक कंबर मोडली! मोदींनी सांगितली सरकारच्या कठोर निर्णयांची Inside Story
नाशिक TCS प्रकरणात मोठी अपडेट! इम्तियाज जलील, मतीन पटेल यांच्यासह...
नाशिक TCS प्रकरणात मोठी अपडेट! इम्तियाज जलील, मतीन पटेल यांच्यासह 11 जणांविरोधात पुरवणी दोषारोपपत्र दाखल
मोठी बातमी! फळबागा वाचवण्यासाठी फडणवीसांचा मोठा निर्णय; बोअरवेल...
मोठी बातमी! फळबागा वाचवण्यासाठी फडणवीसांचा मोठा निर्णय; बोअरवेल वापरण्याची...
मुख्यमंत्र्यांच्या शेतकरी दिवाळीवर संजय राऊतांचा सवाल; 5000 रुपयांत...
मुख्यमंत्र्यांच्या शेतकरी दिवाळीवर संजय राऊतांचा सवाल; 5000 रुपयांत कशी साजरी होणार दिवाळी?
दुष्काळाने शेतकरी हतबल! जनावरे विकण्याची वेळ, रोहित पवार पाहणीसाठी...
दुष्काळाने शेतकरी हतबल! जनावरे विकण्याची वेळ, रोहित पवार पाहणीसाठी गेले असताना शेतकऱ्यान मांडली व्यथा