
मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानीच्या प्री-वेडिंगच जोरदार सेलिब्रेशन झालं. 3 दिवसांच्या या कार्यक्रमाला तारे-तारकांची मांदियाळी लोटली होती. बॉलिवूडच नाही, आंतरराष्ट्रीय कलाकारांची या भव्य सेलिब्रेशनमध्ये परफॉर्म केलं.

अनंत अंबानी आणि राधिका चतुर्वेदी यांच्या प्री-वेडिंग सेलिब्रेशनला जगाच्या कानाकोपऱ्यातून पाहुणे आले होते. उद्योगच नव्हे, बॉलिवूड, क्रीडा सर्व क्षेत्रातील दिग्गज भावी वधू-वरांना आशिर्वाद देण्यासाठी उपस्थित होते.

जामनगरमध्ये फक्त तीन दिवसात जवळपास 350 विमामांनी ये-जा केली. उद्योग जगतातून अदानींपासून पीरामल आणि बिरलापासून टाटा पर्यंत प्रत्येक दिग्गज बिझनेस घराणी उपस्थित होती.

बॉलिवूडबद्दल बोलायच झाल्यास प्रत्येक स्टार या सेलिब्रेशनला हजर होता. बॉलिवूडमधील महानायक अमिताभ बच्चन ते दक्षिणेचे सुपरस्टार रजनीकांत आणि आमिर, शाहरुख सलमानपर्यंत कलाकार अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंग सेलिब्रेनशला हजर होते. हे भव्य दिव्य आयोजन पाहून सर्वसामान्यांच्या मनात प्रश्न निर्माण झालाय की, लग्नाआधीच्या या प्री-वेडिंगवर किती खर्च झाला असेल?

कारण सोहळाच डोळे दिपवून टाकणार होता. तीन दिवसाच्या या सोहळ्यावर अंदाजे 1000 कोटी रुपये खर्च झाले. मुकेश अंबानी यांच्यासाठी ही रक्कम फार मोठी नाहीय. कारण ब्लूमबर्गच्या रिपोर्ट्नुसार मुकेश अंबानी यांची नेटवर्थ जवळपास 113 अब्ज डॉलर आहे.