दात नेमके कसे साफ करावेत? योग्य पद्धत कोणती?

दातांची निगा राखणे फार गरजेचे आहे. रोज दात स्वच्छ न केल्यास त्यांना कीड लागते. परंतु दात नेमके कसे स्वच्छ करावेत, हे अनेकांना माहिती नाही. परिणामी अनेकांना पुढे दातांचे वेगवेगळे आजार होतात.

| Updated on: Dec 15, 2025 | 2:17 PM
1 / 5
दात हा शरीरातील अत्यंत महत्त्वाचा असा भाग आहे. आपण दाताने अन्न चावतो. अन्न चावल्यानंतर ते गिळतो. यामुळे पोटात अन्नाचे पचन होण्यास मदत होते. मात्र याच दातांची योग्य काळजी न घेतल्यास भविष्यात मोठ्या अडचणी निर्माण होऊ शकतात. दात किडणे, तोंडाची दुर्गंधी येणे, दात पडणे अशा समस्या निर्माण होतात.

2 / 5
म्हणूनच दातांची योग्य निगा राखणे खूप गरजेचे आहे. दात स्वच्छ करून, दात घासून आपण त्यांची निगा राखू शकतो. पण अनेकजण चुकीच्या पद्धतीने दात घासतात. परिणामी फायदा होण्याऐवची दातांचे नुकसानच जास्त होते. त्यामुळे योग्य पद्धतीने दात कसे घासावेत हे जाणून घेऊयात.

3 / 5
खरं म्हणजे दात घासताना गम लाईन साफ करावी, असे सांगितले जाते. म्हणजेच दात ज्या ठिकाणाहून बाहेर येतात, ती जागा स्वच्छ करावी, असे अभिप्रेत असते. पण आपण संपूर्ण दात, हिरड्यादेखील ब्रशने घासतो. त्यामुळे हिरड्या झिजतात आणि दातांची मुळं उघडी पडतात. भविष्यात दातांना झिणझिण्या येणे, दात पडण्याची समस्या सुरू होते.

4 / 5
अनेकजण हॉरिझॉन्टल (आडव्या) पद्धतीने ब्रश करतात. ब्रश करण्याची ही पद्धत चुकीची आहे. खरं म्हणजे दात वरून खाली घासायला हवेत. गोल-गोल पद्धतीने ब्रश फिरवल्यासही दात चांगले स्वच्छ होतात. दातांवर ब्रश जोरात घासू नये. उलट हालक्या हातांनी दात साफ करायला हवेत.

5 / 5
(टीप- ही प्राथमिक माहितीवर आधारलेली स्टोरी आहे. आम्ही या स्टोरीमध्ये कोणताही दावा करत नाही. तसेच कोणताही प्रयोग करण्याआधी अगोदर डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा. )