आयुष्यात कधीच येणार नाही स्ट्रेस, फक्त हे 5 नियम पाळा!
ताण जाणवत असताना काही मिनिटे हळूहळू दीर्घ श्वास घ्या. ध्यान, प्राणायाम किंवा शांत बसण्यामुळे मन स्थिर करण्यास मदत होऊ शकते. दिवसभरातील काही वेळ स्वतःसाठी राखून ठेवा.

आजकाल स्ट्रेस हा खूपच गंभीर विषय होऊन बसला आहे. कामाचे प्रेशर असल्याने अनेकांना आजकाल हा त्रास जाणवतोय. यावर विजय कसा मिळवायचा, स्ट्रेस नियंत्रणात कसा ठेवायचा ते जाणून घेऊ या.
नियमित व्यायाम आणि चालण्याची सवय लावा : दररोज 20 ते 30 मिनिटे चालणे किंवा हलका व्यायाम करा. व्यायामामुळे शरीरातील ताण कमी होण्यास आणि मूड सुधारण्यास मदत होते. सतत बसून काम करत असाल तर मध्येच काही मिनिटांचा ब्रेक घ्या.
पुरेशी आणि नियमित झोप घ्या : झोपेची वेळ निश्चित ठेवल्याने शरीर आणि मनाला आराम मिळतो. दररोज साधारण 7 ते 9 तासांची झोप घेण्याचा प्रयत्न करा. झोपण्यापूर्वी मोबाईल आणि इतर स्क्रीनचा वापर कमी करा.
श्वसन आणि ध्यानासाठी वेळ द्या : ताण जाणवत असताना काही मिनिटे हळूहळू दीर्घ श्वास घ्या. ध्यान, प्राणायाम किंवा शांत बसण्यामुळे मन स्थिर करण्यास मदत होऊ शकते. दिवसभरातील काही वेळ स्वतःसाठी राखून ठेवा.
मनातील गोष्टी जवळच्या व्यक्तींशी बोला : ताण किंवा चिंता मनातच ठेवण्याऐवजी विश्वासू व्यक्तीशी संवाद साधा. कामाचे ओझे अधिक वाटत असल्यास कामांना प्राधान्यक्रमानुसार विभागा. ताण सतत जाणवत असेल किंवा दैनंदिन जीवनावर परिणाम होत असेल, तर तज्ज्ञांचा सल्ला घ्या.