
उल्टीचा त्रास हा भयंकर त्रास आहे. प्रवास करताना ज्याला हा त्रास होतो त्याला काहीच सुचत नाही. अनेक लोकांकडून अनेक सल्ले दिले जातात. ज्याला त्रास होतो तो सुद्धा या सल्ल्याने गोंधळून जातो.

प्रवासात उल्टीचा त्रास होतो. उलटी थांबवण्यासाठी अनेकजण अनेक उपाय सांगतात. यात एक कॉमन उपाय असतो तो म्हणजे वेलची. वेलची खाल्ल्यावर उल्टीची समस्या होत नाही. तुम्हाला जर प्रवासात असाच मळमळ, उल्टीचा त्रास होत असेल तर तुम्ही वेलची खाऊ शकता.

उल्टी सारखी समस्या व्हिटॅमिन सी रोखू शकते. लिंबू यावर उत्तम उपाय आहे. लिंबामध्ये व्हिटॅमिन सी खूप प्रमाणात असते. लिंबाचा रस, लिंबू पाणी प्रवासात प्यायलं की तुम्हाला हा त्रास होणार नाही.

बडीशेप फक्त माऊथफ्रेशनर नाही. तुम्ही जेवण झाल्यावर रात्री झोपताना बडीशेप खाता. बडीशेप उलट्यांवर उत्तम उपाय आहे. तुम्हाला मळमळ झाली की तुम्ही बडीशेप खाऊ शकता. बडीशेपच्या चवीमध्ये उल्टीचा त्रास रोखण्याची क्षमता असते.

लवंग खाल्ल्याने उल्टीचा त्रास होत नाही. उलट्या आणि मळमळ टाळायची असेल तर लवंग तोंडात