Amla Shampoo At Home: घरीच बनवा आवळ्याचा शॅम्पू! जाणून घ्या साहित्य आणि कृती!

आवळा, रिठा आणि शिकेकाई यांसारख्या नैसर्गिक घटकांपासून तयार केलेला हर्बल शॅम्पू केस आणि टाळू स्वच्छ ठेवण्यास मदत करतो

| Updated on: Nov 22, 2026 | 3:32 PM
1 / 5
आवश्यक साहित्य :सुकी शिकेकाई – १० तुकडे, सुका आवळा – ८ ते १० तुकडे, रिठा – ५ ते ६ तुकडे, मेथीदाणे आणि जवस – प्रत्येकी १ चमचा, कढीपत्ता आणि कडुनिंबाची पाने – प्रत्येकी १० ते १२, जास्वंदाची फुले आणि पाने – प्रत्येकी ६ ते ७, कोरफड – अर्धा कप, पाणी – १ लिटर,

आवश्यक साहित्य :सुकी शिकेकाई – १० तुकडे, सुका आवळा – ८ ते १० तुकडे, रिठा – ५ ते ६ तुकडे, मेथीदाणे आणि जवस – प्रत्येकी १ चमचा, कढीपत्ता आणि कडुनिंबाची पाने – प्रत्येकी १० ते १२, जास्वंदाची फुले आणि पाने – प्रत्येकी ६ ते ७, कोरफड – अर्धा कप, पाणी – १ लिटर,

2 / 5

आवळा, रिठा, शिकेकाई, मेथीदाणे आणि जवस एका लिटर पाण्यात रात्रभर भिजत ठेवा. त्यामुळे हे सर्व घटक मऊ होतील. सकाळी या मिश्रणात कढीपत्ता, कडुनिंबाची पाने, जास्वंदाची फुले व पाने आणि अर्धा कप कोरफड घाला. हे मिश्रण मध्यम आचेवर साधारण १५ मिनिटे उकळा.

3 / 5

पाणी निम्मे झाल्यानंतर गॅस बंद करा. मिश्रण पूर्णपणे थंड झाल्यावर स्वच्छ सुती कापडाने किंवा बारीक गाळणीने गाळून घ्या. तयार शॅम्पू स्वच्छ बाटलीत भरून ठेवा.

4 / 5

शॅम्पू वापरण्यापूर्वी बाटली हलवा. केस आणि टाळू पाण्याने ओले करून हा शॅम्पू मुळांपासून लावा. बोटांच्या टोकांनी ३ ते ५ मिनिटे हलक्या हाताने मसाज करा. नंतर पाण्याने स्वच्छ धुवा.

5 / 5

हा शॅम्पू वापरताना केसांच्या आणि टाळूच्या प्रकृतीनुसार वापराचे प्रमाण ठरवा. नैसर्गिक घटकांमुळेही काहींना ॲलर्जी किंवा जळजळ होऊ शकते, त्यामुळे आधी थोड्या भागावर चाचणी करा. हा घरगुती शॅम्पू असल्याने त्यात प्रिझर्व्हेटिव्ह नसतात; त्यामुळे फ्रिजमध्ये ठेवा, थोड्या प्रमाणात तयार करा आणि वास, रंग किंवा पोत बदलल्यास वापरू नका.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us