Mutton : झणझणीत चणा मटणाची सोपी रेसिपी; एकदा चव चाखली की दोन प्लेट खाल्ल्याशिवाय राहणार नाही

रविवारचा मांसाहारी बेत आणखी खास करायचा असेल, तर चणा मटणाची ही झणझणीत रेसिपी नक्की करून पाहा. जाणून घ्या चणा मटण बनवण्यासाठी लागणारे साहित्य आणि सोपी कृती.

| Updated on: Nov 15, 2026 | 9:52 AM
1 / 5
साहित्य: अर्धा किलो मटण, १ कप चणे, २ कांदे, १/२ मोठा चमचा काळी मिरी पूड, २ टोमॅटो, ४ हिरव्या मिरच्या, १ मोठा चमचा आले-लसूण पेस्ट, १/२ मोठा चमचा हळद, चवीनुसार १ मोठा चमचा लाल तिखट, १ मोठा चमचा धणे पूड, १ छोटा चमचा जिरे पूड, १/२ मोठा चमचा गरम मसाला, २ मोठे चमचे कढीपत्ता, कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ.

2 / 5

सर्वप्रथम चणे घेऊन ते अगोदर पाण्यात भिजवून ठेवा. नंतर या मटणाच्या तुकड्यांमध्ये थोडे मीठ, अर्धा चमचा हळद आणि थोडी आले-लसूण पेस्ट घालून २० मिनिटे भिजत ठेवा. आता गॅसवर प्रेशर कुकर ठेवा.

3 / 5

कढीपत्ता, चिरलेल्या हिरव्या मिरच्या आणि चिरलेला कांदा घाला. कांदा पारदर्शक आणि मऊ होईपर्यंत परता. एक मोठा चमचा आले-लसूण पेस्ट घालून तिचा वास जाईपर्यंत परता. चिरलेले टोमॅटो घालून ते मऊ होईपर्यंत शिजवा.

4 / 5

आता मॅरीनेट केलेले मटणाचे तुकडे घालून १० मिनिटे परतून घ्या. थोडी हळद, अर्धा चमचा धणेपूड, अर्धा चमचा जिरेपूड, काळी मिरीपूड आणि गरम मसाला घाला.

5 / 5

आता भिजवलेली डाळ घाला आणि त्यात पुरेसे पाणी घाला. त्यानंतर, प्रेशर कुकरचे झाकण लावा आणि ३ शिट्ट्या होईपर्यंत गॅसवर ठेवा. मटण मऊ होईपर्यंत शिजवा.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us