लग्नानंतर आधार कार्डावर नाव बदलण्यासाठी किती खर्च येतो? कसे कराल अपडेट? जाणून घ्या A टू Z माहिती

आधार कार्डवर पतीचे नाव कसे समाविष्ट करावे? ऑनलाईन अपॉइंटमेंट कशी घ्यावी आणि ऑफलाइन फॉर्म कसा भरावा, याची संपूर्ण माहिती आणि लागणारी कागदपत्रे आता एका क्लिकवर

| Updated on: Jan 25, 2026 | 3:28 PM
1 / 8
आधार कार्ड हे आजच्या काळात प्रत्येक भारतीय नागरिकासाठी सर्वात महत्त्वाचे ओळखपत्र मानले जाते. सरकारी योजना असो किंवा बँकेचे काम, आधारशिवाय कोणतीही गोष्ट पूर्ण होत नाही.

2 / 8
विशेषतः लग्नानंतर अनेक महिलांना आपल्या आधार कार्डवर पतीचे नाव समाविष्ट करण्याची गरज भासते. यामुळे बँक खाते अपडेट करणे, पासपोर्ट काढणे, रेशन कार्ड किंवा संयुक्त खाती उघडणे यांसारख्या कामांसाठी कागदपत्रांची पडताळणी करणे सोपे होते.

3 / 8
आधार कार्डमध्ये पतीचे नाव जोडण्यासाठी तुमच्याकडे विवाह प्रमाणपत्र (Marriage Certificate) असणे अत्यंत आवश्यक आहे. यासोबतच पती आणि पत्नी दोघांचेही आधार कार्ड आणि ओळखपत्रे सोबत ठेवावीत.

4 / 8
महत्त्वाची बाब म्हणजे, आधारशी लिंक केलेला मोबाईल नंबर सक्रिय असावा, जेणेकरून प्रक्रियेदरम्यान येणारा ओटीपी (OTP) प्राप्त करता येईल. तुम्ही घरबसल्या UIDAI च्या वेबसाइटवर जाऊन अपॉइंटमेंट घेऊ शकता.

5 / 8
सर्वप्रथम UIDAI च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या. तिथे Book an Appointment हा पर्याय निवडा. तुमचे शहर आणि जवळचे आधार सेवा केंद्र निवडून सोयीस्कर वेळ (Time Slot) निश्चित करा. आवश्यक माहिती भरून अपॉइंटमेंटची पुष्टी करा आणि दिलेल्या वेळेत केंद्रावर पोहोचा.

6 / 8
जर तुम्हाला ऑनलाइन प्रक्रिया जमत नसेल, तर तुम्ही थेट जवळच्या आधार सेवा केंद्रावर जाऊन आधार अपडेट फॉर्म भरू शकता. फॉर्ममधील 'केअर ऑफ' (C/O) विभागात पतीचे नाव लिहून आवश्यक कागदपत्रे जोडावीत.

7 / 8
बायोमेट्रिक पडताळणी झाल्यानंतर तुम्हाला एक अपडेट स्लिप दिली जाईल. आधार कार्डमधील या बदलासाठी सरकारी नियमानुसार ५० रुपये शुल्क आकारले जाते. एकदा अर्ज केल्यानंतर साधारणपणे ७ ते १५ दिवसांत आधार कार्ड अपडेट होते.

8 / 8
तुम्ही UIDAI च्या वेबसाइटवर तुमच्या अर्जाची स्थिती (Status) देखील तपासू शकता. जरी आधारवर नाव बदलणे अनिवार्य नसले, तरी भविष्यातील कामांसाठी ते अत्यंत सोयीचे ठरते.