
तनूच वजन एकवेळ खूप जास्त होतं. 24 वर्षांची असताना ती आपल्या वयापेक्षा दुप्पट वाटायची. पण तिने आता फक्त वजनच घटवलेलं नाही, तर मस्क्युलर बॉडी बनवलीय.

तनू सांगते योग्य डाएटसह रोज वर्कआऊट बॅलन्स केला, तर वजन कमी करता येऊ शकतं. आहारात ती काय खाते ते तिने शेअर केलय.


तनू दिवसाची सुरुवात दोन ग्लास पाणी पिऊन करते. त्यामुळे बॉडी टॉक्सिन बाहेर पडतात. तिचं प्री-वर्कआऊट मील प्रोटीनने भरलेला असतो. यात केळं, अंड्याचा सफेद भाग आणि पीनट बटर आहे.

ब्रेकफास्टमध्ये तनू चिया सीड्स आणि रात्री भिजवून ठेवलेले ओट्सची पुडिंग खाते. त्यानंतर वाटीभर फ्रूट्स खाते. त्यामुळे न्यूट्रिएंट्स बॅलन्स राहतात. तनुचा दुपारचा लंच प्रोटीनने भरलेला असतो. यात कमी तेलात बनवलेलं चिकन असतं.