CJP Protest : सोनम वांगचूक यांच्या आंदोलनाला महाराष्ट्रातून मोठा पाठिंबा, लाठीचार्जचे महाराष्ट्रात कुठे-कुठे उमटले पडसाद, जाणून घ्या.

CJP Protest : दिल्लीत आज कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन सुरु आहे. केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलक संसदेवर धडकणार आहेत. सोनम वांगचूक आणि अभिजीत दीपके यांच्या आंदोलनाला महाराष्ट्रातून मोठा पाठिंबा मिळत आहे.

| Updated on: Jul 20, 2026 | 3:45 PM
1 / 5
 दिल्लीत आज कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन सुरु आहे. केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलक संसदेवर धडकणार आहेत. सोनम वांगचूक आणि अभिजीत दीपके यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज ठाण्यात शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जितेंद्र आव्हाड यांनी आंदोलन केलं. जितेंद्र आव्हाड यांनी सरकारवर भरपूर तोंडसुख घेतलं.

दिल्लीत आज कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन सुरु आहे. केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलक संसदेवर धडकणार आहेत. सोनम वांगचूक आणि अभिजीत दीपके यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज ठाण्यात शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जितेंद्र आव्हाड यांनी आंदोलन केलं. जितेंद्र आव्हाड यांनी सरकारवर भरपूर तोंडसुख घेतलं.

2 / 5

दिल्लीतल्या कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पुण्यात FTI मध्ये आंदोलन करण्यात आलं. भरपूर मुलांनी जीवन संपवलं. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा आम्हाला हवा आहे. सरकारला काही ऐकू येत नाहीय. सोनम वांगचूक यांना कोणी भेटलं सुद्धा नाही. त्यांना जबरदस्तीने उचललं असं पुणे FTI मधील आंदोलकाने सांगितलं.

3 / 5

दिल्लीतल्या सोनम वांगचूक आणि अभिजीत दीपके यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज कोल्हापुरात इंडिया आघाडीने मार्च काढला होता. त्यांनी मोदी सरकार विरोधात घोषणा दिल्या. कोल्हापूर मध्यवर्ती बस स्थानक परिसरात रास्ता रोको करण्यात आला.

4 / 5

दिल्ली येथील आंदोलनात झालेल्या लाठी चार्जचे छत्रपती संभाजीनगरमध्ये पडसाद. छत्रपती संभाजीनगरच्या क्रांतीचौकात, आझाद जनता पार्टी व वकील मंडळीच्या वतीने आंदोलन सुरू. केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलकांची जोरदार घोषणाबाजी, धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेण्याची मागणी. क्रांती चौकात मोठ्या संख्येने आंदोलक एकत्र, आंदोलनात विद्यार्थ्यांचाही सहभाग.

5 / 5

दिल्ली येथे आंदोलकांवर लाठीचार्ज झाल्यानंतर परभणीत देखील उमटले पडसाद. दिल्ली येथील जंतर मंतरवर सुरू असलेल्या आंदोलनाच्या समर्थनात, परभणीत देखील विविध सामाजिक संघटनांकडून एक दिवसीय लाक्षणिक उपोषण सुरूवात. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरातील मैदानावर आंदोलनाला सुरुवात. जिल्ह्यातील नागरिक आणि विद्यार्थी मोठया संख्येने आंदोलनात सहभागी झाल्याच चित्र.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us