ही अभिनेत्री 40 व्या वर्षी अडकणार विवाहबंधनात, बॉयफ्रेंडसोबत घेणार सात फेरे
बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री वयाच्या 40 व्या वर्षी अडकणार विवाहबंधनात. या दिवशी आपल्या बॉयफ्रेंडसोबत करणार लग्न. कोण आहे ती अभिनेत्री? जाणून घ्या सविस्तर

बॉलिवूड अभिनेत्री हुमा कुरैशी सध्या तिच्या प्रोफेशनल लाइफसोबतच पर्सनल आयुष्यामुळेही चर्चेत आहे. माध्यमांमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे की, हुमा यंदाच्या वर्षा अखेरीस आपल्या लॉन्ग-टाइम बॉयफ्रेंड रचित सिंहसोबत आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात करू शकते.

मिळालेल्या माहितीनुसार, ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर 2026 दरम्यान दोघे लग्नबंधनात अडकण्याची शक्यता आहे. त्यामुळे हुमा लवकरच खऱ्या आयुष्यात वधू बनण्याच्या तयारीत असल्याचे समजते.

या प्रेमकथेतील मोठा टर्निंग पॉइंट सप्टेंबर 2025 मध्ये आला. रिपोर्ट्सनुसार, रचित सिंहने अमेरिकेत अत्यंत रोमँटिक पद्धतीने हुमाला प्रपोज केले होते. हुमानेही तत्काळ होकार देत दोघांनी तिथेच एका खासगी समारंभात साखरपुडा केला. मात्र, या जोडप्याने आपला साखरपुडा बऱ्याच काळापर्यंत गुप्त ठेवला होता. आता मात्र त्यांच्या लग्नाच्या चर्चांनी जोर पकडला आहे.

हुमा कुरैशीला साधेपणाने आणि जवळच्या माणसांच्या उपस्थितीत लग्न करण्याची इच्छा आहे. त्यामुळे लग्न सोहळा अतिशय खासगी आणि मर्यादित पाहुण्यांमध्ये पार पडणार आहे. लग्नानंतर मात्र मुंबईत एक भव्य रिसेप्शन आयोजित केले जाणार असून, त्यात बॉलिवूडमधील अनेक मोठ्या सेलिब्रिटींची उपस्थिती अपेक्षित आहे.

हुमा आणि रचित यांची प्रेमकथा एखाद्या चित्रपटासारखीच रंगतदार आहे. दोघांना पहिल्यांदा ‘थम्मा’ या चित्रपटाच्या स्क्रीनिंगदरम्यान एकत्र पाहण्यात आले होते. त्यानंतर सोनाक्षी सिन्हाच्या लग्नात त्यांच्या केमिस्ट्रीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. अलीकडेच मुंबई विमानतळावर दोघे एकत्र दिसल्यानंतर त्यांच्या नात्याबाबतच्या चर्चा अधिकच वाढल्या आहेत.