Russia Ukraine War: काय आहे C17 एअरक्राफ्ट ज्याचा वापर यूक्रेनमधून भारतीयांना आणण्यासाठी केला जाणार आहे?

| Updated on: Mar 01, 2022 | 2:22 PM

C17 Aircraft : हे विमान उतरण्यासाठी 3500 फूट लांब रनवे लागतो. मात्र, अगदी 1500 फूटांच्या रनवेवरही हे विमान उतरवता येतं. जगात अमेरिका, ब्रिटनसह भारतही या विमानांचा वापर करतो. भारताने अमेरिकेकडूनच या विमानची खरेदी केली आहे.

1 / 5
बोईंग सी-17 ग्लोबमास्टर....एक असा महायोद्धा, ज्याची तुलना कशाचीच होऊ शकत नाही. हे जगातील सर्वात मोठ्या मालवाहक विमानांपैकी एक आहे. 15 ऑगस्टला जेव्हा तालिबानने अफगाणिस्तानवर ताबा मिळवला. तेव्हा अमेरिकेच्या हवाई तलाने या विमानाने तब्बल 823 अफगाण नागरिकांसह 183 चिमुरड्यांना अफगाणिस्तानातून बाहेर काढलं. यावरुन तुम्ही या विमानात किती प्रवासी सामावू शकतात, याचा विचार करा. आता युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी हेच सी-17 ग्लोबमास्टर विमान पाठवलं जाण्याची शक्यता आहे.

2 / 5
सैन्याला मदत पोहचवणं असो की, आपत्कालीन परिस्थितीत लोकांची सुटका करणं, या विमानाला तोड नाही. याचा अवाढव्य आकार पाहुन शत्रू अवाक होतात. या विमानाला 4 दमदार इंजिन आहेत. लँडिंगवेळी त्रास होऊ नये, म्हणून या विमानाला रिव्हर्स गिअरही देण्यात आलेत. 1980 आणि 90 च्या दशकात या विमानाची निर्मिती झालीय.

3 / 5
या विमानाची लांबी 174 फूट, रुंदी 170 फूट, तर उंची- 55 फूट आहे. अमेरिकन संरक्षण मंत्रालयाच्या माहितीनुसार, हे विमान एकावेळी 77 टन वजन घेऊन जाऊ शकतं. एकाच वेळी 150 जवान हत्यारांसह यातून प्रवास करु शकतात. या विमानात एकाच वेळी 3 हेलिकॉप्टर, 2 ट्रक किंवा अगदी रणगाडेही नेता येऊ शकतात.

4 / 5
हे विमान उतरण्यासाठी 3500 फूट लांब रनवे लागतो. मात्र, अगदी 1500 फूटांच्या रनवेवरही हे विमान उतरवता येतं. जगात अमेरिका, ब्रिटनसह भारतही या विमानांचा वापर करतो. भारताने अमेरिकेकडूनच या विमानची खरेदी केली आहे. भारताकडे तिसऱ्या पिढीचे c-17 ग्लोबमास्टर विमानं आहेत, ज्यांची सध्याची संख्या ही 11 आहे. अगदी लेह लडाखच्या दुर्गम भागातही भारताने हा विमान उतरवलंय...कोरोना काळात अगदी ऑक्सिजन टँकर देशाच्या विविध भागात पोहचवण्यासाठीही ग्लोबमास्टरचा वापर करण्यात आला होता.

5 / 5
आणीबाणीच्या परिस्थितीत मदत पोहचवणं असो, शस्र पुरवणं असो की लोकांची सुटका करणं, ग्लोबमास्टरच्या क्षमतेला तोड नाही. म्हणूनच जेव्हा तालिबानने अफगाणिस्तानवर ताबा मिळवला, तेव्हा भारतानेही या विमानाचा वापर करुन अफगाण आणि परदेशी नागरिकांसह भारतीयांची सुटका केली. 22 ऑगस्टला या विमानाने 168 जणांना दिल्लीत उतरवलं. या विमानात 3 क्रू मेंबर असतात. ज्यात 2 पायलट आणि 1 लोडमास्टर असतो. लोडमास्टर विमानतळावर माल चढवण्याचं काम करतो. विमानाच्या मागील बाजूच्या महाकाय दरवाजातून माल चढवला जातो. अगदी गाड्या असो, बस असो वा रणगाडे, या विमानात सहज चढवता येतात. शस्रसाठाही सहज लोड करता येतो. त्यामुळे कुठल्याही सैन्यासाठी c-17 ग्लोबमास्टर हा कुठल्याही महायोद्ध्यापेक्षा कमी नाही.