
आयएएस अधिकारी अन्सार शेख... अन्सार हे 2016 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. काही दिवसांआधी त्यांना लग्नगाठ बांधली. त्यानंतर अन्सार यांनी पत्नीसोबतचे काही खास फोटो शेअर केलेत.

अन्सार शेख आणि त्यांच्या पत्नी वैजा अन्सारी यांचे हे खास फोटो... अन्सार यांनी ब्लेझर घातलं. तर वैजा यांनी ब्लॅक कलरची साडी नेसली आहे. या दोघांच्या फोटोंना नेटकऱ्यांची पसंती मिळतेय.

2016 साली अन्सार शेख हे युपीएससी परीक्षा पास झाले होते. त्यांनी 361 हा रँक मिळवला होता. रिक्षा चालकाचा मुलगा आयएएस झाला. त्यामुळे अन्सार यांचं प्रचंड कौतुक झालं होतं.

24 डिसेंबर 2023 या दिवशी अन्सार आणि वैजा हे विवाहबद्ध झाले. अन्सार शेख यांनी वैजा अन्सारी यांच्याशी लग्नगाठ बांधली. त्यांच्या लग्नाची सर्वत्र चर्चा झाली.

अन्सार आणि वैजा यांची जोडी नेटकऱ्यांना आवडते. या दोघांच्या फोटोंवर नेटकरी लाईक आणि कमेंट्स करत असतात. रब ने बना दी जोडी म्हणत नेटकऱ्याने अन्सार आणि वैजा यांच्या फोटोवर कमेंट केलीय.