
प्रत्येकालाच सरकारी नोकरी हवी असते. सरकारी नोकरी म्हटलं की आयुष्या स्थिरस्थावर झालं, असं समजलं जातं. शासकीय नोकरी असणारा तरुण किंवा तरुणी यांना लगेच चांगले विवाहस्थळ यायला लागतात. परंतु अशी एक शासकीय नोकरी आहे, जी मिळाल्यावर लग्नाच्या मोठ्या अडचणी निर्माण होतात.

यूपीएससी उत्तीर्ण करून आयएएस, आयपीएस झालेल्या अधिकाऱ्यांना लग्न करायच असेल तर त्यांच्या लग्नाची प्रक्रिया थोडी किचकट असते. त्यातही दोन आएएस, दोन आयपीएस अधिकारी लग्न करणार असतील तर मात्र अनेक प्रोटोकॉल पाळावे लागतात. अशा लग्नासाठी अनेक नियमांचे पालन करावे लागते.

दोन आयएएस, आयपीएस अधिकारी लग्न करणार असतील तर त्यांच्या कार्यक्षेत्राचा प्रश्न उपस्थित होतो. कारण लग्नानंतर अशा अधिकाऱ्यांना एकाच राज्यात पोस्टिंग हवी असते. या सर्व बाबीची तजवित सरकारला करावी लागते.

एखाद्या आयएएस, आयपीएस अधिकाऱ्याला परदेशी व्यक्तीशी लग्न करायचे असेल तर सरकारकडून अधिकृत परवानगी घ्यावी लागते. कारण अशा लग्नामुळे देशाच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित होणार नाही ना? याची सरकारला खात्री करून घ्यावी लागते.

लग्न करायचे असेल तर आयएएस, आयपीएस अधिकाऱ्यांना काही गोष्टींचे पालन करावे लागते. त्यामुळेच दोन्ही आयएएस, एयपीएस यांचे लग्न होणार असेल तर त्यांना या सर्व नियमांचे पालन करावे लागते. एखाद्या व्यक्तीचा विवाह रोखण्याचा सरकारला अधिकार नाही. परंतु आयएएस, आयपीएस अधिकाऱ्यांना मात्र काही नियमांचे पालन कारवे लागते.