
हरियाणातील माजी मुख्यमंत्री चौधरी भजनलाल यांच्या त्या सून आहेत. चौधरी भजनलाल तीन वेळा हरियाणाचे मुख्यमंत्री राहिले आहे. त्यांचे पती भव्य बिश्नोई हे भजनलाल यांचे नातू आहे.

भव्य यांचे वडील कुलदीप बिश्नोई हिसारचे खासदार राहिले आहेत तर काका चंद्रमोहन बिश्नोई हरियाणाचे उपमुख्यमंत्री होते. भव्य बिश्नोई आणि परी बिश्नोई यांचा विवाह 22 डिसेंबर 2023 रोजी त्यांचे लग्न झाले. भव्य बिश्नोई ही आमदार होते. परंतु नुकताच झालेल्या निवडणुकीत ते पराभूत झाले.

2023 मध्ये लग्नाच्या दीड वर्षानंतर 2025 मध्ये त्यांना गोड बातमी मिळाली. IAS परी बिश्नोई यांनी मुलीला जन्म दिला आहे. 24 फेब्रुवारी 2025 रोजी त्यांच्या घरी लक्ष्मीच्या रूपाने मुलीचा जन्म झाला.

राजस्थानमधील बिकानेर येथील परी बिश्नोई यांचे शालेय शिक्षण अजमेर येथे झाले. त्यांनी दिल्ली विद्यापीठातून पदवी घेतली. राजशास्त्रात त्यांनी एमए केले.

यूजीसीकडून घेण्यात येणारी नीट परीक्षेत त्यांना यश मिळाले होते. आयएएस बनण्याची प्रेरणा त्यांना आईकडून मिळाली. त्यांची आई राजस्थान पोलिसांत होती. त्यांच्याकडून लोकांसोबत काम करण्याची प्रेरणा मिळाली.

आयएएस परी यांनी तिसऱ्या प्रयत्नात यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली. पण भव्यासोबत लग्नानंतर त्यांनी हरियाणात आपला कॅडर बदलला.