Knowledge : इंटरनॅशनल फ्लाईटमध्ये झाला बाळाचा जन्म, तर कोणत्या देशाचं नागरिकत्व मिळतं?

विमान प्रवास हा प्रत्येकासाठी एक सुंदर अनुभव असतो, पण जर एखाद्या महिलेने हजारो फूट उंचीवर बाळाला जन्म दिला तर काय होतं? बाळाच्या नागरिकत्वाबाबत मनात अनेक प्रश्न निर्माण होणे स्वाभाविक आहे. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

| Updated on: Oct 01, 2025 | 2:46 PM
1 / 6
कधीकधी आपल्याला आश्चर्यकारक बातम्या ऐकायला मिळतात, उदा ट्रेनमध्ये किंवा विमानात बाळाचा जन्म झाला. या घटना ऐकायला रोमांचक असल्या तरी, त्या तितक्याच आव्हानात्मक देखील असतात. विशेषतः, एखाद्या विमानात, तेही आंतरराष्ट्रीय प्रवासादरम्यान बाळाचा जन्म झाला तर त्याच्या नागरिकत्वाबद्दल अनेक प्रश्न उपस्थित होतात. ( photo : Canva)

2 / 6
अशा घटना फारच दुर्मिळ असतात, कारण बहुतेक विमान कंपन्या या गरोदर महिलांना 28 किंवा 36 आठवड्यांनंतर प्रवास करण्याची परवानगी देत ​​नाहीत. काही विमान कंपन्या वैद्यकीय प्रमाणपत्रासह प्रवास करण्याची परवानगी देतात, परंतु उड्डाणादरम्यान प्रसूतीची शक्यता खूप कमी असते.

3 / 6
जर एखाद्या मुलाचा जन्म विमानात झाला तर त्याचे नागरिकत्व अनेक गोष्टींवर अवलंबून असते. उदा - त्यावेळी विमान कुठे होते, विमान कोणत्या देशात नोंदणीकृत आहे आणि पालक कोणत्या देशाचे नागरिक आहेत,असे काही मुद्दे लक्षात घ्यावे लागतात.

4 / 6
जगातील बहुतेक देश हाच नियम पाळतात. ते पालकांच्या नागरिकत्वाच्या आधारे मुलाचे नागरिकत्व ठरवतात. भारतातही असाच नियम आहे. जर एखाद्या मुलाचा जन्म परदेशात विमानात झाला आणि पालकांपैकी एक भारतीय असेल, तर ते बाळ कोणत्याही देशात जन्मलं असला तरी, तो भारतीय नागरिकत्व मिळवू शकतो.

5 / 6
आता आपण आंतरराष्ट्रीय कायद्याबद्दल जाणून घेऊया. जर एखाद्या देशाच्या हवाई हद्दीत मूल जन्माला आले तर तो देश त्याच्या कायद्यानुसार त्या बाळाला नागरिकत्व देऊ शकतो. उदाहरणार्थ, अमेरिका त्याच्या हवाई हद्दीत जन्मलेल्या मुलांना अमेरिकन नागरिकत्व देते.

6 / 6
जर एखाद्या बाळाचा जन्म अशा भागात किंवा क्षेत्रात झाला , जो कोणत्याही देशाच्या सीमेत नाही (उदा - समुद्रात), तर त्या मुलाचे नागरिकत्व निश्चित करणे थोडे कठीण होते. मात्र अशा परिस्थितीत, त्या विमानाचे उड्डाण ज्या देशात नोंदणीकृत असते, (नागरिकत्वासाठी)  तो देश सहसा विचारात घेतला जातो.