तुमच्याकडे असतील हे तीन गुण तर शत्रू घेईल पायशी लोळण, चाणक्य नीतीमधील गुपितं माहिती आहेत का?

शत्रूवर विजय कसा मिळवायचा याबाबत चाणक्य नीतीमध्ये अनेक महत्त्वाच्या गोष्टी सांगण्यात आलेल्या आहेत. परंतु या तीन गोष्टी तुमच्याकडे असतील तर तुम्ही तुमच्या प्रतिस्पर्ध्यास पराभूत करू शकता.

| Updated on: Apr 04, 2026 | 10:50 PM
1 / 5
आचार्य चाणक्य यांनी समृद्धपणे जगण्यासाठी नेमकं काय काय करायला हवं, याबाबत सगळं सांगून ठेवलेलं आहे. शत्रूला पराभूत कसे करायचे, शत्रूच्या दोन पावलं पुढे कसे राहायचे, याबाबत आचार्य चाणक्य यांची नीती आजही तेवढीच कामी येते. चाणक्य नीतीत काय सांगितलेले आहे, ते जाणून घेऊ या..

आचार्य चाणक्य यांनी समृद्धपणे जगण्यासाठी नेमकं काय काय करायला हवं, याबाबत सगळं सांगून ठेवलेलं आहे. शत्रूला पराभूत कसे करायचे, शत्रूच्या दोन पावलं पुढे कसे राहायचे, याबाबत आचार्य चाणक्य यांची नीती आजही तेवढीच कामी येते. चाणक्य नीतीत काय सांगितलेले आहे, ते जाणून घेऊ या..

2 / 5

तुम्हाला विजयी व्हायचे असेल तर समोरच्या शत्रूला, स्पर्धकाला कधीही कमजोर समजू नये, ही पहिली अट आहे. शत्रूला कमजोर समजण्याची चूक केल्यास त्याच क्षणी आपला अर्धा पराभव झालेला असतो, असे चाणक्य नीती सांगते.

3 / 5

तुम्हाला शत्रूला पराभूत करायचे असेल तर त्याची रणनीती, त्याची विचार करण्याची पद्धत समजून घेणे खूप गरजेचे आहे. त्याच्या रणनीतीचा अभ्यास न करताच तुम्ही त्याला पराभूत करायला निघाल्यास तुमचाच पराभव होण्याची शक्यता दाट असते. त्यामुळे चाणक्य नीतीमधील या शिकवणीकडे अजिबात दुर्लक्ष करू नये.

4 / 5

चाणक्य नीतीनुसार शत्रूसोबत कायम शांतपणेच व्यवहार केला पाहिजे. त्याने केलेल्या कोणत्याही कृतीचे उत्तर रागात, संतापात देऊ नये. कारण त्यामुळे तुमचेच नुकसान होण्याची दाट शक्यता असते. शत्रूला तुम्ही मित्र असल्याचे वाटले पाहिजे. म्हणजे तुम्हाला तुम्हाला त्याच्यावर विजय मिळवणे सोपे होते.

5 / 5

Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us