AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra Rain Update : पावसाबद्दल मोठी अपडेट! विजांच्या कडकडाटासह धो धो पाऊस, पुढील 24 तासात..

Maharashtra Rain Update : राज्यात काही दिवसांपूर्वी जोरदार पावसाने हजेरी लावली. त्यामध्येच अनेक धरणांमध्ये पाणी साठा वाढला. आजही भारतीय हवामान विभागाकडून पावसाचा मोठा इशारा देण्यात आला. विदर्भात आज पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे.

Maharashtra Rain Update : पावसाबद्दल मोठी अपडेट! विजांच्या कडकडाटासह धो धो पाऊस, पुढील 24 तासात..
Maharashtra Rain
| Updated on: Jul 11, 2026 | 7:28 AM
Share

राज्यात जोरदार पाऊस झाला. मॉन्सूनच्या पाऊस धुव्वाधार झाला. यंदा राज्यात मॉन्सून उशीराने दाखल झाला. पण अनेक भागात अतिमुसळधार पाऊस झाला. राज्यात आता पावसाचा जोर कमी झाला असला तरीही पावसाची उघछाप सुरू आहे. आजही अनेक भागात पावसाचा इशारा देण्यात आला. पावसाला पोषख वातावरण असून विजांच्या कडकाडाटासह पाऊस होण्याचा अंदाज आहे. विदर्भात पावसाला पोषक वातावरण असून विदर्भात पाऊस पडण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांच्या तुलनेत राज्यात पावसाचा जोर कमी झाला. पण पुढच्या आठवड्यापासून पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. संपूर्ण देशात मॉन्सून सक्रिय झाला. अनेक राज्यात पाऊस कोसळत आहे. एल निनोमुळे देशात यंदा मॉन्सूनचा पाऊस होणार नसून दुष्काळ पडण्याचा अंदाज होता. पण देशात जोरदार पाऊस हजेरी लावताना दिसत आहे.

दोन तीन दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे राज्यातील धरणांच्या पाणी पातळीत वाढ झाली. इगतपुरी तालुक्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे प्रमुख धरणांच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. सध्या दारणा धरणात 53.67 टक्के, मुकणे धरणात 34.63 टक्के, भावली धरणात 89 टक्के, भाम धरणात 50 टक्के, वाकी धरणात 23 टक्के, वालदेवी धरणात 72 टक्के आणि मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या वैतरणा धरणात 50 टक्के पाणीसाठा झाला आहे.

धरणांतील वाढलेला पाणीसाठा दिलासादायक असला तरी गेल्या दोन दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्याने पाणीसाठ्यातील वाढीचा वेग मंदावला आहे. आगामी काळात होणाऱ्या पावसावर धरणांतील पाणीसाठ्याची पुढील स्थिती अवलंबून राहणार आहे. पुणे  शहर आणि जिल्ह्यात आठ दिवसांपासून संततधार कोसळणाऱ्या पावसाने मागील 24 तासांपासून विश्रांती घेतली आहे.

काल दिवसभर शहरातील आकाश निरभ्र होते. अजूनही चांगल्या पावसाची प्रतिक्षा कायम आहे. इगतपुरी नगर परिषद हद्दीतील गिरणारे गावात भर पावसातही पाण्याची टंचाई. आधीच आठवड्यातून तीन दिवस पाणीपुरवठा होतो त्यातही 20 ते तीस मिनिटे येते नळाला पाणी. त्यातही पाण्याची वेळ नाही. संतापलेल्या महिला उतरल्या रस्त्यावर. आज पावसाचा इशारा विदर्भात देण्यात आला. बाकी भागात हवामान पाऊस काही प्रमाणात कोसळेल.

Follow Us
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
अभिजीत दीपके आजीच्या अंत्यदर्शनाला मुकले; दिल्ली पोलिसांच्या कारवाई...
अभिजीत दीपके आजीच्या अंत्यदर्शनाला मुकले; दिल्ली पोलिसांच्या कारवाईमुळे नातेवाईकांची तीव्र नाराजी
दिल्लीतील 57 मेट्रो स्थानके बंद; सर्वोच्च न्यायालयात गृह सचिवांविरोधात
दिल्लीतील 57 मेट्रो स्थानके बंद; सर्वोच्च न्यायालयात गृह सचिवांविरोधात अवमान याचिका! सुनावणी सुरु