रेल्वेचे कन्फर्म तात्काळ तिकीट हवे, तर IRCTC वर आधीच करा या 5 आवश्यक सेटिंग्स…
जर तुम्ही ट्रेनने प्रवास करणार असाल तर कन्फर्म तिकीट मिळाले नाही तर तत्काळ तिकीट कामी येते. परंतू तत्काळ तिकीट बुक करणे सोपे नसते. बुकींग सुरु होताच काही मिनिटात बहुतांशी सीट भरतात. पेमेंट करताना प्रवाशाची माहिती भरण्यास उशीर झाल्यास तिकीट बुक होत नाही. जर तिकीट बुक करण्याआधी या खालील ५ बाबींची काळजी घेतली तर तुम्ही आयआरसीटीसीवर तात्काळ तिकीट बुक करु शकता आणि वेळही वाचेल..

आयआरसीटीसीवर तात्काळ तिकीट बुक करण्यासाठी Aadhaar Authentication गरजेचे असते. यासाठी आयआरसीटीसीच्या वेबसाईट वा ऐप्समध्ये जाऊन My Account मध्ये Authenticate Userच्या ऑप्शनवर जावे. येथे तुमचा आधारनंबर टाकून OTP द्वारे व्हेरिफिकेशन पूर्ण करावे. आधारशी लिंक केलेला मोबाईल नंबर तुमच्याकडे ओटीपीसाठी असणे गरजेचे असते.
Master List मध्ये आधीपासून सेव्ह करा पॅसेंजरची डिटेल्स - तात्काळ तिकीट बुक करताना प्रवाशाचे नाव, वय, आणि जेंडर भरण्यास वेळ लागू शकतो. त्यामुळे आयआरसीटीसीच्या MY Master List मध्ये जाऊन आधीचे प्रवाशांसाठी डिजिटल सेवा सेव्ह करा. यामुळे तिकीट भरताना वारंवार माहिती भरण्याची गरज नाही.
मोबाईल नंबर अपडेट - आयआरसीटीसीच्या खात्यात आपल्या योग्य चालू नंबर ठेवावा. तिकीट बुकींग दरम्यान OTP ची गरज लागू शकते.त्यामुळे असा नंबर वापरावा जो तुमच्याकडे असेल आणि ज्यावर तुम्हाला तातडीने ऑटीपो लागेल.
पेमेंटची पद्धती आधीच तयार ठेवावा - तात्काळ तिकीट बुक करताना पेमेंट करायला उशीर झाल्याने समस्या येऊ शकते. यासाठी आपले युपीआय ऐप्स नेहमीच तयार ठेवावे. बँक अकाऊंटमध्ये पुरेसे बॅलन्स राखावे. UPI PIN देखील लक्षात ठेवावे. यामुळे पेमेंट करताना गोंधळ उडणार नाही.
ट्रेन आणि आसनाची माहिती आधीच तयार ठेवा - तिकीट बुकींग सुरु होण्याच्या आधी ट्रेन नंबर, प्रवासाची तारीख, बोर्डिंग स्टेशन आणि डेस्टीनेशन निश्चित करावे. तसेच आपल्या पसंतीची बर्थ आधीच विचार करुन ठेवावी. त्यामुळे बुकींगच्या वेळी वारंवार माहिती शोधावी लागणार नाही.
केव्हा सुरु होते तात्काळ तिकीट बुकींग ?- IRCTC वर AC क्लाससाठी तात्काळ तिकीट बुकींग सकाळी १० वाजता आणि नॉन - एसी क्लाससाठी सकाळी ११ वाजता सुरु होत असते. प्रवासाच्या तारखांच्या एक दिवस आधी बुकींग उघडते. यामुळे वेळेच्या आधी लॉग इन करुन सर्व माहिती तयार ठेवावी.