
बटरफ्लाय बीच, गोवा - गोव्यातील गर्दीपासून दूर शांतता हवी असेल.तर तुमच्यासाठी बटरफ्लाय बीच एक परफेक्ट ऑप्शन आहे. साऊथ गोव्यातील या तुरळक गर्दीअसलेल्या सुंदर बिचवर पोहचण्यासाठी बोट किंवा पायीच पोहचावे लागते.त्यामुळेच येथे फारशी गर्दी नसते. निळेशार स्वच्छ पाणी, समुद्राच्या लाटांचा झुळूझुळू आवाज आणि पाचूसारख्या हिरवाईने नटलेला हा बिच खरोखरच साल 2026 साठी तुमच्या बकेट लिस्टमध्ये हवाच !

चांदीपुर बीच, ओडिशा -चांदीपुर बीच हा देखील भारताच्या सर्वात अनोख्या बिचपैकी एक आहे.. येथे आपल्या अलिबाग बिचप्रमाणे ओहोटीला समुद्राचे पाणी एकदम मागे जाते.आणि वाळूच नजरेस येते.हा नजारा पाहण्यासारखा असतो.थंडगार रेशमी वाळूत चालण्याची मजा काही औरच...ओडिशाच्या बालासोर येथून जवळ असलेला हा बिच अजूनही मास टुरिझमपासून दूर आहे. येथे 'तुम्ही जिंदगी कैसी हे पहेली..हाय' असे म्हणत राजेश खन्नाप्रमाणे दीर्घ वॉक करु शकता.जोडीदारासोबत समुद्राच्या वाळूत शंख शिपले शोधू शकता आणि स्थानिक मच्छीमारांचे दैनंदिन जीवन जवळून पाहू शकता.

ओम बिच, कर्नाटक - गोकर्णपासून जवळ असलेला हा ओम बिच नावाप्रमाणेच त्याच्या स्पिरिच्युअल वाईब आणि नैसर्गिक सौदर्यसाठी ओळखला जातो. उंचावरून हा बिच ओम अक्षराप्रमाणे दिसतो. त्यामुळे त्याला हे नाव पडले.येथील नीरव शांतता, तुरळक गर्दी, खूपच आयसोलेटेड नसलेला बिच तुमचे मन मोहून टाकेल. आरामात निवांतपणे निसर्गाचा आस्वाद घेणाऱ्यांसाठी जंटल वेव्ह्स, बेसिक कॅफे आणि सनराईज-सनसेट व्यूज् पसंद पडतील.

मिनिकॉय बिच,लक्षद्वीप - मिनिकॉय बेट मुख्य भारतीय भूमीपासून एकदम वेगळाच अनुभव देते.टरक्वॉईज वॉटर,कोरल रिफ्स आणि समुद्र बेटांतील शांत दैनंदिन जीवन या बिचची ओळख आहे.येथील पर्यटन मर्यादित आहे.त्यामुळे लोकल कल्चर आणि नैसर्गिक सौदर्य कायम आहे.स्नॉर्कलिंग, बिच वॉक्स आणि मच्छीमारांची छोटी खेडी पाहणे येथील मुख्य एट्रॅक्शन आहे.

पॅराडाईस बिच, पुदुचेरी - पॅराडाईस बिच पुदुचेरी शहराच्या जवळ असूनही हा गर्दीपासून दूर आहे. कारण येथे पोहचण्यासाठी बोट राईडने पोहचावे लागते.येथील नरम मुलायम वाळू, मोकळी जागा, सागराची गाज तुमचे मनमोहन टाकेल. येथे कायमस्वरुपाची दुकाने वा जास्त गर्दी नाही.त्यामुळे वातावरणात एकदम नैसर्गिक शांतता आहे. येथील सुर्योदय आणि सूर्यास्त सर्वात सुंदर दिसतो.