Knowledge : या देशातील हॉटेलमध्ये फक्त खाण्याचे नव्हे, काटा-चमच्यांचेही मोजावे लागतात पैसे, कारण..

Restaurants That Charges Plates Spoons : जर तुम्ही या देशात जाऊन, तिथे रेस्टॉरंटमध्ये जेवायचा विचार करत असाल तर सावध रहा. तिथे फक्त जेवणाचेच बिल आकारले जात नाही तर टेबल, चाकू आणि चमचे यांचेही बिल वेगळे आकारले जाते.

| Updated on: Oct 29, 2025 | 2:59 PM
1 / 8
कल्पना करा की तुम्ही एका सुंदर युरोपियन रेस्टॉरंटमध्ये आला आहात, टेबल सजवलेले आहे, वातावरण रोमँटिक आहे आणि तुम्ही पोटभर चविष्ट जेवणानंतर जेव्हा बिल मागता... वेटर हसून तुम्हाला बिल देतो... पण ते पाहून डोळेच विस्फारतात ! कारण त्या बिलामध्ये फक्त जेवण नव्हे तर काटा-चमच्यांचे देखील पैसे आकारले असतील तर ? वाचून आश्चर्य वाटलं ना, पण हे खरं आहे. इटलीमध्ये खरंच असं होतं, जिथे फक्त जेवणाचे, पदार्थांचे नव्हे तर कटलरीचा खर्चही बिलामध्ये दिला जातो आणि ते पैसे आकारले जातात.  (Photo : Getty Images / Freepik)

2 / 8
जर तुम्हाला वाटत असेल की तुम्हाला रेस्टॉरंटमध्ये फक्त जेवणाचे पैसे भरावे लागतील, तर इटलीला भेट दिल्यावर तुमचा भ्रम नक्कीच दूर होईल. जेव्हा तुम्ही तिथल्या रेस्टॉरंटमध्ये जेवण ऑर्डर करता तेव्हा बिलात कॅपर्टो नावाचा एक वेगळा विभाग जोडला जातो. पण ते म्हणजे काही टीप नव्हे तर त्यामध्ये टेबल, प्लेट्स आणि कटलरीचा चार्ज असतो, जी रक्कम बिलामध्ये ॲड केलेली असते.

3 / 8
कोपेर्टो हा इटालियन शब्द आहे ज्याचा अर्थ कव्हर चार्ज आहे. जवळजवळ प्रत्येक इटालियन रेस्टॉरंटमध्ये हे पारंपारिक शुल्क आकारला जातो. मात्र हे काही सेवा शुल्क नव्हे, कारण त्यात वेटरसाठी टीप नसते. या शुल्कात टेबलक्लॉथ, ब्रेड, चमचे, चाकू, प्लेट्स आणि कधीकधी पाण्याचे ग्लास यासारख्या सुविधांचा खर्च समाविष्ट असतो.

4 / 8
साधारणपणे हे शुल्क प्रति व्यक्ती 1.50 ते 3.00 यूरो (अंदाजे 135 ते 270 रुपये) पर्यंत असते. तथापि, काही प्रीमियम रेस्टॉरंट्स किंवा पर्यटन स्थळांमध्ये, शुल्क 5 यूरोपर्यंत जाऊ शकते.

5 / 8
विशेष म्हणजे, अनेक रेस्टॉरंटमध्ये हे मेनूमध्ये आधीच लहान अक्षरात लिहिलेले असते, जेणेकरून ग्राहकांना कळावे की,  हे अतिरिक्त शुल्क समाविष्ट असेल.

6 / 8
मध्ययुगीन काळापासून चालत आलेल्या या परंपरेमागे एक व्यावहारिक कारण आहे. प्राचीन काळी ग्राहक (हॉटेलमध्ये)  स्वतःचे अन्न आणत पण रेस्टॉरंटमधील भांडी आणि टेबल वापरायचे.

7 / 8
 या सोयीच्या बदल्यातच कोपर्टो शुल्काची सुरुवात झाली. कालांतराने, ती एक सांस्कृतिक परंपरा बनली जी आजही अनेक क्षेत्रांमध्ये टिकून आहे. कोपर्टो हे पर्यायी शुल्क नाही. ते रेस्टॉरंट धोरणाचा भाग आहे, म्हणून ग्राहक ते नाकारू शकत नाहीत.

8 / 8
मात्र, जर एखाद्या रेस्टॉरंटने मेनूवर (याबद्दल) स्पष्टपणे माहिती लिहीली नसेल, तर तुम्ही तक्रार दाखल करू शकता, कारण इटालियन कायद्यानुसार Copertoबद्दल आधीच लेखी स्वरूपात सांगणे आवश्यक आहे.