Vastu Shastra : घरात मोर पंख कुठे,कसा लावायचा ते जाणून घ्या, चुंबकासारखी सुखं, समृद्धी खेचून येईल

Vastu Shastra : वास्तू शास्त्रात असे अनेक उपाय सांगितले आहेत, जे घरात सकारात्मक ऊर्जा वाढवतात आणि वास्तू दोष दूर करायला मदत करतात. वास्तू शास्त्रात घरातली प्रत्येक छोटी-मोठी गोष्ट योग्य दिशेला कशी असावी हे सांगितलं आहे.

| Updated on: Apr 01, 2026 | 4:25 PM
1 / 5
तुम्ही अनेकांना घरात मोर पंख ठेवताना पाहिलं असेल. याचा फक्त घराच्या सजावटीसाठी उपयोग होत नाही. यामुळे सकारात्मकता वाढते.

तुम्ही अनेकांना घरात मोर पंख ठेवताना पाहिलं असेल. याचा फक्त घराच्या सजावटीसाठी उपयोग होत नाही. यामुळे सकारात्मकता वाढते.

2 / 5

तुम्ही मोर पंख पूजा घरात ईशान्य कोनात उत्तर पूर्व दिशेला ठेऊ शकता. असं केल्याने नकारात्मकता दूर होते. घरात शांतता राहते. बेडरुममध्ये तुम्ही मोरपंख दक्षिण-पश्चिम भिंतीवर लावू शकता. यामुळे नात्यात प्रेम टिकून राहतं.

3 / 5

तुम्ही घराच्या प्रवेशद्वारावर तीन मोरपंख लावले तर ते नकारात्मक एनर्जीला घरात प्रवेश करण्यापासून रोखतात. यामुळे घरात सुख-समृद्धि टिकून राहते. घराची तिजोरी आणि कपाटात मोर पंख ठेवणं चांगलं मानलं जातं. यामुळे आर्थिक स्थिरता टिकून राहते.

4 / 5

ऑफिस डेस्कवर मोर पंख ठेवणं चांगलं मानलं जातं. यामुळे कामात एकाग्रता वाढते. त्याचा फायदा तुम्ही पाहू शकता. मुलांची अभ्यासात एकाग्रता वाढवण्यासाठी मुलांच्या स्टडी रुममध्ये तुम्ही मोर पंख ठेऊ शकता. पुस्तकात, वहीत मोर पंख ठेवणं शुभ मानलं जातं.

5 / 5

जेव्हा तुम्ही कधी बाहेर जाता, तेव्हा नेहमी स्वत:सोबत मोर पंख ठेवा. यामुळे अमंगल टळत असं म्हटलं जातं. उशी खाली सुद्धा तुम्ही मोर पंख ठेऊ शकता. वास्तू शास्त्रात असं सुद्धा म्हटलय की, जेव्हा कधी तुम्हाला पडलेला मोर पंख मिळतो, ते तुमचं भाग्य उघडण्याचं संकेत मानला जातो.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us