Aaryavir Sehwag: बाप सुतळी बॉम्ब तर मुलगा फुसका बार, वीरेंद्र सेहवागच्या मुलाने केली घोर निराशा, बॅटिंग पाहून येईल राग!
Aaryavir Sehwag: भारतीय क्रिकेट संघाचा माजी स्फोटक सलामीवीर वीरेंद्र सेहवागचा मुलगा सध्या भारताच्या १९ वर्षांखालील संघाकडून खेळत आहे.

जेव्हा भारतीय क्रिकेट संघाचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग फलंदाजीसाठी मैदानात उतरला, तेव्हा गोलंदाजांची अवस्था बिकट झाली होती. पहिल्याच चेंडूपासून चौकार आणि षटकार मारण्यात पटाईत असलेल्या सेहवागने अनेक गोलंदाजांचे करिअर उद्ध्वस्त केले.
सेहवागप्रमाणेच, त्याचा मुलगा आर्यवीर आता व्यावसायिक क्रिकेटमध्ये करिअर करत आहे, पण वीरेंद्र सेहवाग ज्या स्फोटक फलंदाजीसाठी प्रसिद्ध होता, ती त्याच्यात नाही.
सेहवागचा मुलगा आर्यवीर सध्या भारताच्या १९ वर्षांखालील संघाकडून खेळत आहे. भारत १९ वर्षांखालील आणि ऑस्ट्रेलिया १९ वर्षांखालील संघात एकदिवसीय मालिका खेळली जात आहे.
मालिकेतील दुसऱ्या सामन्यात, आर्यवीर लक्ष्य रायचंदानीसोबत डावाची सुरुवात करण्यासाठी मैदानात उतरला. लक्ष्य आणि आर्यवीर दोघांनीही संघासाठी संथ सुरुवात केली आणि २९ चेंडूंमध्ये केवळ ११ धावा केल्या.
लक्ष्य बाद झाल्यानंतर, आर्यवीरची फलंदाजी आणखी मंदावली. एकदिवसीय सामन्यात कसोटी सामन्याप्रमाणे फलंदाजी करताना, आर्यवीर ४८ चेंडू खेळून ४७ धावांवर धावबाद झाला. या खेळीत आर्यवीरने एकही षटकार न मारता नऊ चौकार मारले. त्याचा स्ट्राईक रेट ९७.९२ होता.