IND vs WI: टीम इंडिया सहज जिंकली असती, पण 2 बॉल शिल्लक असताना अचानक मॅच थांबली, पुढे असं काय घडलं?

IND vs WI 4th t20 Match: शेवटचे दोन चेंडू शिल्लक असताना भारतीय संघ सर्वबाद झाला. टीम इंडियाकडे सामना जिंकण्याची संधी होती पण केवळ एका गोष्टीमुळे सामना गमवावा लागला.

| Updated on: Oct 15, 2026 | 8:43 AM
1 / 5
हैदराबादच्या राजीव गांधी इंटरनेशनल स्टेडिअमवर वेस्ट इंडिजने टीम इंडियाचा 24 धावांनी पराभव केला. आता दोन्ही संघाने  मालिकेत 2-2ने बरोबरी केली आहे.

हैदराबादच्या राजीव गांधी इंटरनेशनल स्टेडिअमवर वेस्ट इंडिजने टीम इंडियाचा 24 धावांनी पराभव केला. आता दोन्ही संघाने मालिकेत 2-2ने बरोबरी केली आहे.

2 / 5

वेस्ट इंडिजने टीम इंडियासमोर 248 धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडिया 223 वरच सर्वबाद झाली तर विंडिजने हा सामना 24 धावांनी जिंकला आहे. टीम इंडियाला शेवटच्या ओव्हरला 35 धावा हवा होत्या. त्यावेळेस मैदानात अर्शदिप आणि मयंक यादव होते. तर वेस्ट इंडिजकडून शामर जोसेफ गोलंदाजीची धुरा सांभाळत होता.

3 / 5

यावेळी जोसेफच्या पहिल्याच बॉलला अर्शदिपने चौकार मारला. त्यानंतर दुसरा बॉल वाईड गेला आणि पुढचे दोन्ही बॉलमध्ये अर्शदिपने एकही धावा केल्या नाहीत. नंतर जोसेफने टाकलेला चौथा बॉल अर्शदिपच्या खांद्याला लागला. त्याला प्रचंड दुखापत होऊ लागली. त्याला व्हिवळताना पाहून फिजिओ मैदानात आले पण फिजिओच्या उपचारानंतर अर्शदिपची दुखणे कमी झाले नाही.

4 / 5

शेवटी नितीन मेनननी अर्शदिपची चर्चा केली आणि श्रेयसनेही त्याला मैदानाबाहेर यायला सांगितले. त्यानंतर अर्शदिप रिटायर्ड हर्ट घोषित केले. टीम इंडिया सर्वबाद झाली.

5 / 5

अशाप्रकारे दोन बॉल शिल्लक असतानाच वेस्ट इंडिजला विजयी घोषीत करण्यात आले. जर अर्शदीपला दुखापत झाली नसती तर टीम इंडिया जिंकली असती अशी शक्यता नाकारता येत नाही.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us