
यशस्वी जयस्वालने आपल्या डेब्यू सामन्यामध्ये शतक केलं असून 143 नाबाद धावांवर खेळत आहे. भारताबाहेर डेब्यू सामन्यामध्ये शतक करणारा पहिला सलामीवीर ठरला आहे.

वयाच्या अवघ्या 21 वर्षी पठ्ठ्याने जबरदस्त खेळी करत संघसाठी जबरदस्त योगदान दिलं आहे. इंतकंच नाहीतर त्याला द्विशतक ठोकण्याचीही संधी आहे.

यशस्वी जयस्वालने शतक केल्यावर बोलताना, मैदानामध्ये त्याला कर्णधार रोहित शर्मा त्याला कशा प्रकारे बॅटींग करायला हवी त सांगत होता. त्यासोबतच रोहितने त्याचा आत्मविश्वासही वाढवल्याचं जयस्वालने सांगितलं.

माझ्यासाठी हा भावनिक क्षण असून मी त्याचा आनंद घेत आहे. अजुनही मी नाबाद असून मला खेळायला आवडेल, असं जयस्वालने सांगितलं आहे.

तिसऱ्या दिवशी यशस्वील जयस्वाल किती धावा करतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आता जयस्वाल 143 धावांवर नाबाद खेळत असून त्याच्यासोबत मैदानात विराट कोहली 36 धावांंवर नाबाद आहे.