PHOTO| भारताचा अमेरिका, जपान, ऑस्ट्रेलियासोबत युद्ध सराव; चीन अस्वस्थ

| Updated on: Nov 04, 2020 | 12:32 AM

1 / 6
भारताने अमेरिका, जपान, ऑस्ट्रेलिया या तीन देशांसोबत मंगळवारपासून (3 नोव्हेंबर)  मलबार युद्ध सराव सुरु केला आहे.

2 / 6
पहिल्या टप्प्यातील युद्ध सरावाला विशाखापट्टणम येथील बंगालच्या खाडीपासून सुरुवात झाली आहे. हा युद्ध सराव एकूण तीन दिवस चालणार आहे. 6 नोव्हेंबरला या युद्ध सराव संपणार आहे.

3 / 6
 बंगालच्या खाडीत होणाऱ्या युद्ध सरावात ऑस्ट्रेलियादेखील सामील होणार असल्याचे भारताने जाहीर केले हाते. अमेरिकेने भारताच्या या निर्णयावर कुठलाही आक्षेप नोंदवला नाही. त्यानंतर मंगळवारी हा युद्धसराव सुरु झाला आहे.

4 / 6
पूर्व लडाखच्या मुद्द्यावरुन भारत आणि चीनमध्ये तणाव आहे. या पार्श्वभूमीवर भारताने बंगालच्या खाडीत युद्ध सराव सुरु केल्यामुळे चीन काहीसा अस्वस्थ आहे.

5 / 6
अमेरिका, ऑस्ट्रेलीया, जपान सोबत भारताचा युद्ध सराव सुरु असताना चीनने यावर प्रतिक्रिया दिली आहे. चीनने म्हटलंय, हा अभ्यास शांती आणि स्थिरता प्रस्थापित करण्यासाठी अनुकूल असेल.

6 / 6
बंगालच्या खाडीतील हा युद्ध सराव विशेषत्वाने भारतीय नौदल, अमेरिका नौदल, जपान मेरिटाईम सेल्फ डिफेन्स फोर्स, ऑस्ट्रेलीयन नौदलांमध्ये सुरु आहे.