
देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा हाहाकार पाहायला मिळत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कोरोनाबाधितांचा आकडा वाढला आहे.

सांकेतिक फोटो

घरगुती उपाय करून कोरोनाची लक्षणे दूर करा

भारतातील दुसऱ्या कोरोनाच्या लाटेसाठी हा व्हेरिएंट कारणीभूत ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे ब्रिटनच्या विनंतीनंतर या व्हेरिएंटचे नमुने अभ्यासासाठी लंडनला पाठवले जाणार आहेत.

तसेच या व्हेरिएंटवर सध्याची कोरोना लस प्रभावी ठरते की नाही याचाही अभ्यास केला जाणार आहे. येत्या काही दिवसात हे नमुने तपासणीसाठी पाठवले जाणार आहे.

हैदराबादजवळील सेंटर फॉर सेल्युलर अणि आण्विक जीवशास्त्रचे माजी संचालक राकेश मिश्रा यांनी याबाबत एका वृत्तपत्राला माहिती दिली आहे.

विशेष म्हणजे कोरोनाचा हा नवीन भारतीय स्ट्रेन अमेरिका, ब्रिटन आणि सिंगापूरसह सह किमान 17 देशांमध्ये आढळला आहे. त्यामुळे जगभरात कोरोनाचा धोका वाढू शकतो, अशी शक्यता WHO ने वर्तवली आहे.