लोकांच्या गर्दीपासून दूर, शांततेच्या छायेत…भारतातील 4 अध्यात्मिक स्थळे
भारतात अनेक अध्यात्मिक स्थळे आहेत. या स्थळांना दररोज हजारो नागरिक भेटी देत असतात. जाणून घ्या भारतातील 4 पर्यटनस्थळे.

अनेकांना लोकांच्या गर्दीपासून दूर असलेल्या अध्यात्मिक स्थळे ठिकाणी फिरायला आवडते. भारतातील विविध भागात अध्यात्मिक, ऐतिहासिक स्थळे आढळून येतात. भारतातील समृद्ध परंपरेचा अनुभव जाणून घ्या.
अयोध्या, उत्तर प्रदेश : अयोध्यामध्ये नव्याने राम मंदिर बांधण्यात आलं आहे. या मंदिराला मागील काही वर्षांत अनेकांनी भेटी दिल्या आहेत. या मंदिराव्यतिरिक्त भक्त सरयू नदीच्या काठावरही फेरफटका मारू शकतात.
केदारनाथ, उत्तराखंड : हिमालयाच्या पर्वतरांगामध्ये भगवान शिवाचं मंदिर आहे. या मंदिरात जाण्यासाठी खूप पायपीट करावी लागते. केदारनाथचं भारतातील आध्यात्मिक महत्व असलेलं तीर्थक्षेत्र आहे .
बोधगया, बिहार : बोधगया हे बौद्ध धर्मीयांचं जगातील सर्वात महत्त्वाचं स्थळ आहे. बोधगया येथील बोधी वृक्षाखाली सिद्धार्थ गौतमांना ज्ञानप्राप्ती होऊन बुद्ध झाले होते. बोधगयामध्ये शांततामय वातावरण असते.
धर्मशाला, हिमाचल प्रदेश : धर्मशाला हे हिमालयाच्या कुशीत वसलेलं ठिकाण आहे. या शहरात अनेक बौद्ध मठ आहेत . या भागात तुम्हाला बौद्धांची संस्कृती अनुभवायला मिळते. या शहरातील शांतमय वातावरण आनंदीमय असते.