
सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही मोठी आणि महत्वाची बातमी आहे. विशेष म्हणजे थेट भारतीय डाक विभाग अर्थात पोस्ट आॅफिसमध्ये नोकरी करण्याची मोठी संधी ही तुमच्याकडे आहे.

विशेष बाब म्हणजे ही एकप्रकारची मोठी भरतीच म्हणावी लागेल. दहावी पास उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज ही करू शकतात.

78 पदांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे. 16 फेब्रवारी 2024 ही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची संधी आहे. विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला आॅफलाईन पद्धतीने अर्ज करावी लागणार आहेत.

उमेदवारांना 100 रुपयांच्या पोस्टल ऑर्डरसह मेल मोटर सर्विस कानपुर, जीपीओ कंपाउंड, कानपुर 208001 उत्तर प्रदेश येथे अर्ज ही पाठवावी लागणार आहेत.

या भरती प्रक्रियेसाठी वयाची अट ही लागू करण्यात आलीये. 18 ते 27 वयोगटातील उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत.