रोहित शर्माचा मोठा विक्रम; 12 हजार ODI धावा पूर्ण, सचिन-विराटनंतर अशी कामगिरी करणारा तिसरा भारतीय

Rohit Sharma 12000 ODI Runs : रोहित शर्माने वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या वनडेत 12,000 एकदिवसीय धावा पूर्ण करत मोठा टप्पा गाठला. भारताच्या विजयाचा पाया रचला. भारताने या वेस्ट इंडिजविरुद्धच्या या सामन्याला जिंकत मालिकेत 2-0अशी आघाडी घेतली आहे.

| Updated on: Sep 30, 2026 | 10:47 PM
1 / 5
भारताचा सलामीवीर रोहित शर्माने वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय (ODI) सामन्यात आपल्या एकदिवसीय कारकिर्दीतील १२००० धावांचा टप्पा पूर्ण केला आहे.

भारताचा सलामीवीर रोहित शर्माने वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय (ODI) सामन्यात आपल्या एकदिवसीय कारकिर्दीतील १२००० धावांचा टप्पा पूर्ण केला आहे.

2 / 5

एकदिवसीय क्रिकेटमध्ये १२ हजार धावांचा टप्पा पार करणारा रोहित शर्मा हा सचिन तेंडुलकर आणि विराट कोहलीनंतरचा तिसरा भारतीय फलंदाज ठरला आहे.

3 / 5

रोहितने २८२ डावांमध्ये हा टप्पा गाठला असून, विराट कोहलीनंतर (२४२ डाव) सर्वात कमी डावांमध्ये १२००० धावा करणारा तो जगातील दुसरा फलंदाज बनला आहे.

4 / 5

कमी चेंडूंचा सामना करत १२००० धावा पूर्ण करण्याच्या बाबतीतही रोहित शर्मा विराट कोहलीनंतर (१२८५३ चेंडू) दुसऱ्या क्रमांकावर असून त्याने १२९७३ चेंडूंमध्ये हा विक्रम नोंदवला आहे.

5 / 5

वेस्ट इंडिजने दिलेल्या ४०६ धावांच्या महाकाय आव्हानाचा पाठलाग करताना रोहितने आक्रमक फलंदाजी करत संघाला दमदार सुरुवात मिळवून दिली आणि विजयाचा पाया रचला.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us