
टीम इंडिया आणि झिम्बाब्वेमधील पहिला सामना पार पडला. या सामन्यामध्ये टीम इंडियाच्या कॅप्टनपदाची जबाबदारी शुबमन गिलकडे देण्यात आला आहे. मात्र आपल्या पहिल्या सामन्यात कर्णधार म्हणून तो अपयशी ठरला.

पहिल्याच सामन्यात पराभव झाल्यामुळे झिम्बाब्वेकडून पराभूत झाल्यावर शुबमन गिलच्या नावावर एका वाईट विक्रमाची नोंद झाली आहे. शुबमन गिलच्या नेतृत्त्वाखाली खेळताना टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला.

याआधी महेंद्रसिंग धोनी आणि अजिंक्य रहाणे यांच्या नेतृत्त्वाखाली खेळताना टीम इंडियाला पराभव झाला. 2015 मध्ये झिम्बाब्वे संघाने T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात भारताचा 10 धावांनी पराभव केला होता. तेव्हा भारतीय संघाचा कर्णधार अजिंक्य रहाणे होता. झिम्बाब्वेने एकूण 145 धावा केल्या होत्या, या धावांचा पाठलाग करताना टीम इंडियाला 135 धावा करता आल्या.

2016 मध्ये महेंद्रसिंग धोनी कर्णधार असताना झिम्बाब्वेने भारताचा 2 धावांनी पराभव केला होता. झिम्बाब्वेने प्रथम फलंदाजी करताना 170 धावा केल्या होत्या, ज्याच्या प्रत्युत्तरात टीम इंडियाला केवळ 168 धावा करता आल्या. मनीष पांडे याने सर्वाधिक 48 धावा केल्या होत्या. तर त्यावेळी के. एल. राहुल याला भोपळाही फोडता आला नव्हता.

आजच्या सामन्यात झिम्बाब्वेने प्रथम फलंदाजी करताना 115-9 धावा केल्या. या धावांचा आव्हान करताना टीम इंडिया 102 -10 धावांवर ऑल आऊट झाली. शुबमन गिल याने सर्वाधिक 31 धावा केल्या होत्या. मात्र इतर कोणत्याही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही.