Abhijeet Sawant: घर असावं तर असं.. मुलींचे पेंटिंग्स, म्युझिक रुम अन् बरंच काही; अभिजीत सावंतचं ‘फॅमिली टच’ असलेलं घर

Abhijeet Sawant: अभिजीत सावंतचं हे घर पाहिल्यावर त्याच्या व्यक्तिमत्त्वाची आणखी एक बाजू समोर येते. यश, संगीत, कुटुंब आणि आठवणी यांचा सुंदर संगम असलेलं हे घर त्याच्यासाठी केवळ आलिशान स्पेस नसून भावनिकदृष्ट्याही खास असल्याचं दिसतं.

| Updated on: Sep 22, 2026 | 10:08 AM
1 / 7
‘इंडियन आयडॉल’च्या पहिल्या सिझनचा विजेता आणि लोकप्रिय गायक अभिजीत सावंत आजही त्याच्या आवाजामुळे चाहत्यांच्या मनात खास स्थान निर्माण करून आहे. रिअॅलिटी शोमधून मिळालेल्या लोकप्रियतेनंतर अभिजीतने संगीत क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. आता त्याच्या आलिशान घराची झलक सोशल मीडियावर आणि होम टूरमधून समोर आली आहे.

‘इंडियन आयडॉल’च्या पहिल्या सिझनचा विजेता आणि लोकप्रिय गायक अभिजीत सावंत आजही त्याच्या आवाजामुळे चाहत्यांच्या मनात खास स्थान निर्माण करून आहे. रिअॅलिटी शोमधून मिळालेल्या लोकप्रियतेनंतर अभिजीतने संगीत क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. आता त्याच्या आलिशान घराची झलक सोशल मीडियावर आणि होम टूरमधून समोर आली आहे.

2 / 7

अभिजीतच्या घरातील सजावट पाहून चाहतेही प्रभावित झाले आहेत. विशेष म्हणजे, या घरात केवळ महागड्या वस्तूंना स्थान नसून कुटुंबाच्या आठवणी, मुलींच्या कलाकृती आणि अभिजीतच्या संगीतप्रवासाची झलकही दिसते. घराच्या प्रवेशद्वाराजवळच गणपती बाप्पाची सुंदर मूर्ती ठेवण्यात आली आहे. ही मूर्ती अभिजीतला त्याच्या पहिल्या म्युझिक अल्बमच्या काळात मिळाली होती.

3 / 7

घराचा लिव्हिंग रूम प्रशस्त आणि आकर्षक आहे. सोफ्याच्या मागील भिंतीवर लक्ष वेधून घेणारी जपानी आर्ट पेंटिंग लावण्यात आली आहे. घराच्या सजावटीत रंगसंगतीचाही विशेष विचार करण्यात आला आहे. अभिजीतने घराची रचना वास्तूच्या दृष्टीने केल्याचंही सांगितलं आहे.

4 / 7

या घरातील सर्वात खास गोष्टींपैकी एक म्हणजे अभिजीतच्या मुलींनी स्वतः तयार केलेल्या पेंटिंग्स. या कलाकृती घराच्या भिंतींवर अभिमानाने लावण्यात आल्या आहेत. याशिवाय अभिजीतच्या पत्नीने डिझाइन केलेली घराची नेमप्लेटही विशेष लक्ष वेधून घेते.

5 / 7

अभिजीतने त्याच्या पुरस्कारांसाठीही घरात खास जागा तयार केली आहे. एका कॅबिनेटमध्ये त्याला मिळालेले पुरस्का२र तसेच त्याच्या मुलांना मिळालेले अवॉर्ड्सही ठेवण्यात आले आहेत.

6 / 7

घरातील डाइनिंग एरिया साधा पण कोझी आहे. संपूर्ण कुटुंब एकत्र जेवण्यासाठी ही जागा वापरली जाते. किचनही मॉडर्न आणि साध्या पद्धतीने सजवण्यात आलं आहे. विशेष म्हणजे, अभिजीतचं घर सी-फेसिंग अपार्टमेंट असून बाल्कनीत सुंदर झोपाळा आहे.

7 / 7

अभिजीतसाठी सर्वात महत्त्वाची जागा म्हणजे त्याचा म्युझिक रूम. इथे तो रियाज करतो. खोलीत हार्मोनियम, संगीताशी संबंधित प्रमाणपत्रं, चाहत्यांनी दिलेल्या भेटवस्तू आणि पेंटिंग्स आहेत. याशिवाय घरात छोटंसं स्टुडिओ सेटअपही करण्यात आलं आहे. मुलींची खोली त्यांच्या आवडीनुसार सजवण्यात आली असून त्यात आकर्षक वॉलपेपर आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us