
केएल राहुलला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने 2013 मध्ये 10 लाख रुपयांच्या बेस प्राईसवर संघात घेतलं होतं. आता तो लखनऊ सुपर जायन्ट्सचा कर्णधार आहे आणि कमाई 17 कोटी रुपये आहे. (Photo- PTI)

आयपीएल 2008 मध्ये रवींद्र जडेजाला राजस्थान रॉयल्सने 10 लाख रुपये बेस किमतीत घेतलं होतं. आता चेन्नई सुपर किंग्सकडून खेळत असून त्याची कमाई 16 कोटी रुपये झाली आहे. (Photo- Twitter)

ईशान किशन 2016 मध्ये गुजरात लायन्सकडून पदार्पण केलं होतं. गुजरातने त्याला 35 लाखात आपल्या संघात घेतलं होतं. आता मुंबई इंडियन्सकडून खेळताना त्याची कमाई 15.2 कोटी रुपये आहे. (Photo- BCCI)

आयपीएल 2015 मध्ये हार्दिक पांड्याला मुंबई इंडियन्सने 10 लाखात घेतलं होतं. मात्र आता गुजरात टायटन्सकडून खेळताना त्याची कमाई 15 कोटी झाली आहे. गुजरातचा कर्णधार असून पहिल्याच झटक्यात जेतेपद पटकावलं होतं. (Photo- IPL)

ipl sanju samson

आयपीएल 2011 मध्ये मुंबई इंडियन्सने सूर्यकुमार यादवला 10 लाखात घेतलं होतं.आता सूर्यकुमार यादवची कमाई 8 कोटींच्या घरात पोहोचली आहे.(Photo- IPL)