सिग्नलशिवाय धावणारी भारतातील एकमेव ट्रेन, 124 वर्षांपासून हात दाखवताच थांबते
Unique Train : भारतात रेल्वेचे मोठे नेटवर्क आहे, दररोज लाखो लोक ट्रेनने प्रवास करतात. मात्र भारतात एक अशी ट्रेन आहे जी गेल्या 124 वर्षांपासून विना सिग्नलशिवाय धावते. याबाबत माहिती जाणून घेऊयात.

ट्रेनचे नाव आणि स्थान: ही अनोखी ट्रेन उत्तर प्रदेशातील बुंदेलखंड भागात जालौन जिल्ह्यातील 'एट जंक्शन' ते 'कोंच' दरम्यान धावते. स्थानिक लोक या ट्रेनला प्रेमाने 'अद्दा' (Adda) म्हणून ओळखतात.

विना सिग्नल प्रवास: देशातील इतर सर्व गाड्या सिग्नलच्या आधारावर चालतात, परंतु ही ट्रेन गेल्या 124 वर्षांपासून कोणत्याही सिग्नलशिवाय धावत आहे.

हाथ दाखवल्यावर थांबते: या ट्रेनचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे प्रवाशांनी हात दाखवताच ती थांबते. प्रवाशांना ट्रेन पकडण्यासाठी प्लॅटफॉर्मवर उभे राहून फक्त हात दाखवण्याची गरज असते.

कमी वेग आणि अंतर: ही एक शटल ट्रेन असून तिचा मार्ग केवळ 13 किलोमीटर लांब आहे. ट्रेनचा वेग ताशी 30 किमी असून हे अंतर पार करण्यासाठी तिला साधारण 40 मिनिटे लागतात.

ऐतिहासिक वारसा: या ट्रेनची सुरुवात ब्रिटिशांनी 1902 मध्ये केली होती. आजही ती त्याच जुन्या परंपरेने आणि वैशिष्ट्यांसह सुरू आहे. या ट्रेनला फक्त 3 डबे आहेत. हा मार्ग येथील शेतकरी आणि छोट्या व्यापाऱ्यांसाठी खूप महत्त्वाचा आहे.