
आज आठव्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त, इंडो-तिबेट बॉर्डर पोलीस (ITBP) जवानांनी उत्तरेकडील लडाखपासून पूर्वेकडील सिक्कीमपर्यंतच्या विविध हिमालयीन पर्वतरांगांमध्ये योग करत, त्यांची प्रात्यक्षिके दाखवली.

इंडो-तिबेट बॉर्डर पोलीस (ITBP) जवानांनी ग्रुपने विविध आसने करत योग दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला

ITBP गेल्या काही वर्षांपासून लडाख, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेशसह भारत-चीन सीमेवरील वेगवेगळ्या हिमालयीन पर्वतरांगांमध्ये योगाचा प्रचार करत आहे.

हिमाचल प्रदेशात 16,500 फुटांवर ITBPनेही योगासन केली आहेत. इंडो-तिबेट बॉर्डर पोलिस (ITBP) चे हिमवीर उत्तराखंडमध्ये 14,500 फूट उंचीवर योगासने केला. 33 बटालियन ITBP ने गुवाहाटी येथील लचित घाट येथे ब्रह्मपुत्रा नदीसमोर योगासने केली.

गुवाहाटी येथील लचित घाट येथे ब्रह्मपुत्रा नदीसमोर ITBP च्या 33 बटालियनने योग सत्राचे आयोजन केले होते.

इंडो-तिबेटन बॉर्डर पोलिस (ITBP) च्या सेंट्रल स्की टीमने 14,000 फूट बर्फाच्या रोहतांग पास येथे आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या समारंभात भाग घेतला.