Indurikar Maharaj : इंदुरीकर महाराज यांच्या आयुष्यातील सर्वात कठीण प्रसंग कोणता ? वाचून डोळ्यात येईल पाणी –

इंदुरीकर महाराज हे महाराष्ट्रातील लोकप्रिय कीर्तनकार व समाजप्रबोधक आहेत. विनोदी शैलीतून ते व्यसनाधीनता, अंधश्रद्धा यांसारख्या सामाजिक प्रश्नांवर प्रभावीपणे भाष्य करतात. कीर्तनाला साधना मानत, ते गेली चार दशके समाजजागृती करत आहेत आणि मातृ-पितृ कृतज्ञता सोहळाही आयोजित करतात.

| Updated on: Aug 03, 2026 | 11:53 AM
1 / 5
इंदुरीकर महाराज हे महाराष्ट्रातील अबालवृद्धांमध्ये लोकप्रिय असलेले कीर्तनकार आणि समाजप्रबोधक आहेत. त्यांच्या विनोदी, पण तितक्याच प्रभावी शैलीतील कीर्तनातून समाजातील विविध प्रश्नांवर भाष्य केलं जातं. हसवता हसवता गंभीर संदेश देण्याची त्यांची हातोटी विशेष आहे. व्यसनाधीनता, अंधश्रद्धा, कौटुंबिक कलह, तरुणांमधील वाढती गुन्हेगारी प्रवृत्ती अशा अनेक विषयांवर ते आपल्या खास बोलीभाषेतून आणि शैलीतून समाजाचे प्रबोधन करत आले आहेत. ( All Photos : Social Media)

2 / 5
त्यांच्या अभ्यासपूर्ण सामाजिक निरीक्षणामुळे आणि खुमासदार सादरीकरणामुळे केवळ ज्येष्ठ नागरिकच नाही, तर तरुण पिढीही त्यांच्या कीर्तनाकडे आकर्षित झाली आहे. गेल्या चार दशकांपासून इंदुरीकर महाराज समाजजागृतीचे कार्य करत आहेत. इंदुरीकर महाराजांचे मूळ नाव निवृत्ती काशिनाथ देशमुख आहे. मात्र कीर्तन क्षेत्रातील त्यांच्या योगदानामुळे ते संपूर्ण महाराष्ट्रात ‘इंदुरीकर महाराज’ या नावाने परिचित झाले आहेत.

3 / 5
एका मुलाखतीमध्ये त्यांनी त्यांच्या आयुष्यातील सर्वात वेदनादायक प्रसंग सांगितला. आई आणि वडील यांच्या निधनाच्या वेळी आपण त्यांच्या जवळ नव्हतो, कारण आपण कीर्तनाच्या सेवेत होतो, अशी आठवण त्यांनी भावूक होत सांगितली. महाराजांनी सांगितले की, “माझ्या स्वतःच्या आईच्या अंत्यविधीलाही मी उपस्थित राहू शकलो नाही. त्या दिवशी एकादशी आणि गीता जयंती होती. आईचे निधन झाले तेव्हा मी पुणे जिल्ह्यातील रोकडी गावात कीर्तनासाठी गेलो होतो. त्या काळात संपर्काची साधनेही मर्यादित होती. तेव्हा परत येणं शक्य नव्हतं आणि नेमके काय घडले आहे, याची माहितीही मला मिळू शकली नाही.”

4 / 5
आईच्या अंत्ययात्रेच्या वेळीही आपण सांप्रदायिक सेवेला पाठ फिरवली नाही आणि कीर्तनाची सेवा सुरू ठेवली, असे त्यांनी सांगितले. हा प्रसंग त्यांच्या आयुष्यातील अत्यंत कठीण क्षणांपैकी एक होता. वडिलांच्या निधनाची आठवण सांगताना ते म्हणाले की, “वडील गेले त्या दिवशी श्रावणातील तिसरा सोमवार होता. त्या वेळी मी शिरूर तालुक्यातील रामलिंग येथे कीर्तनासाठी होतो. वडिलांच्या अंत्यविधीच्या दिवशीही मी कीर्तन करत होतो. आई गेली तेव्हाही कीर्तनात होतो आणि माझ्या दोन्ही मुलांच्या जन्माच्या वेळेसही मी कीर्तन सेवेतच होतो.”

5 / 5
आई-वडिलांप्रती असलेल्या कृतज्ञतेबद्दल सांगताना इंदुरीकर महाराज म्हणाले की, वडिलांच्या निधनानंतर त्यांनी आई-वडिलांच्या स्मरणार्थ मातृ-पितृ कृतज्ञता सोहळा सुरू केला. गेल्या २६ वर्षांपासून हा सोहळा ते नियमितपणे आयोजित करत आहेत. गीता जयंतीच्या दिवशी या सोहळ्याची सांगता केली जाते. कीर्तन ही केवळ कला नसून आपली साधना आणि समाजसेवा आहे, या भावनेतून इंदुरीकर महाराज आजही आपल्या कार्यात सातत्याने पुढे जात आहेत. वैयक्तिक आयुष्यातील दुःख बाजूला ठेवून समाजप्रबोधनाची वाट त्यांनी कायम जपली.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us