PHOTO | ‘आयएनएस कवरत्ती’ आज नौदलाच्या ताफ्यात दाखल होणार, काय आहेत या युद्धनौकेची वैशिष्ट्ये?

आयएनएस कवरत्ती ही युद्धनौका आज भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल होणार आहे. ही युद्धनौका पूर्णपणे भारतीय बनावटीची आहे. भारतीय सैन्या प्रमुख एम.एम. नरवणे यांच्या हस्ते ही युद्धनौका नौदलाकडे सुपूर्द करण्यात येणार आहे.

| Updated on: Oct 22, 2020 | 10:23 AM
1 / 7
'आयएनएस कवरत्ती' आज भारतीय नौदल्याच्या ताफ्यात दाखल होणार आहे. भारतीय सैन्य प्रमुख जनरल एम.एम. नरवणे यांच्या हस्ते ही युद्धनौका नौदलाला सुपूर्द करण्यात येईल.

2 / 7
'आयएनएस कवरत्ती' प्रोजेक्ट-28 अंतर्गत पूर्णपणे भारतीय बनावटीची पानबुडी विरोधी युद्धनौका आहे. यापूर्वी अशाच प्रकारच्या तीन युद्धनौका भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल झाल्या आहेत.

3 / 7
'आयएनएस कवरत्ती'ची संरचना भारतीय नौदलाच्या नौसेना डिझाईन महासंचालनालय अर्थात DND या संस्थेनं तयार केली आहे.  या युद्धनौकेची बांधणी कोलकात्यातील गार्डन रीच शिपबिल्डर्स एन्ड इंडीनियर्सकडून करण्यात आली आहे.

4 / 7
'आयएनएस कवरत्ती'ला पाणबुड्यांचा शोध घेणं आणि त्या उद्ध्वस्त करण्यासाठी भारतीय बनावटीचे अत्याधुनिक शस्त्रास्त्र आणि सेंसर सूट क्षमतेनं सज्ज करण्यात आलं आहे.

5 / 7
'आयएनएस कवरत्ती' ही युद्धनौका अण्वस्त्र, रासायनिक आणि जैविक युद्धातही काम करण्यास सक्षम आहे. तसंच लांब पल्ल्याच्या अभियानासाठीही उपयुक्त आहे.

6 / 7
'आयएनएस कवरत्ती'ची लांबी 109 मीटर तर उंची 12.8 मीटर आगे. कवरत्ती अत्याधुनिक शस्त्रास्त्र, रॉकेट लॉंचर्स, एकीकृत हेलिकॉप्टर्स आणि सेंसरने परिपूर्ण आहे.

7 / 7
या युद्धनौकेच्या सुपरस्ट्रक्चरच्या निर्मितीसाठी कार्बन कंपोझिटचा उपयोग करण्यात आला आहे. जो भारतीय युद्धनौका निर्मितीच्या इतिहासात मोठं यश मानलं जात आहे.