
वैष्णवी हगवणे ही लग्नानंतर मुळशीतील भुकूम येथे राहते. तिच्या निधनानंतर घराला कुलूप असल्याचे समोर आले आहे.

वैष्णवीच्या मृत्यूनंतर तिचा पती, सासू आणि नणंद यांना अटक करण्यात आली. तर दीर सुशील आणि सासरे राजेंद्र हगवणे हे फरार होते. त्यांना आज पहाटे अटक करण्यात आली आहे.

वैष्णवीचा मृत्यू झाल्यापासूनच हगवणे यांचे घर बंद आहे.

हगवणे यांच्या घरात घरकाम करणारे घराचे केअरटेकर पाळलेला घोडा, कुत्रा यांची काळजी घेत आहेत. तसेच त्यांचं घरही सांभाळत आहेत.

दरम्यान ज्या हगवणे कुटुंबाच्या घरात वैष्णवीचा छळ करण्यात आला आणि ज्या घरात वैष्णवीचा मृत्यू झाला ते घर सध्या बंद आहे.