
इन्स्टंट नूडल्स: आपल्याला सगळ्यांना मॅगी चांगलीच माहित आहे. मॅगी इन्स्टंट फूड आहे. दोन मिनिटांत मॅगी बनते याची क्रेझ काही वेगळीच असते. आता आयुष्य फास्ट झालंय, सगळ्या गोष्टी लोकांना इन्स्टंट हव्या असतात. मग खायच्या गोष्टी सुद्धा लोकांना तशाच लागणार. मॅगीची क्रेझ बघून अनेक इन्स्टंट नूडल्स मार्केट मध्ये आले. यात काही पौष्टिक नूडल्सचा देखील समावेश आहे. इनस्टंट फूड मध्ये नूडल्स हा एक चांगला पर्याय आहे.

फ्रोजन पराठा: तुम्हाला हा प्रकार माहितेय का? इन्स्टंट फूड मध्ये याचा समावेश होतो. फ्रोजन पराठा तुम्ही कितीही दिवस फ्रिजमध्ये ठेऊ शकता. ते फ्रिजर मध्ये स्टोअर केले जाऊ शकतात. जेव्हा हवे तेव्हा बाहेर काढून आपण ते भाजून खाऊ शकतो. पटकन होणारा हा लोकप्रिय पदार्थ आहे.

इन्स्टंट राईस आणि करी: तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की इन्स्टंट राईस आणि करी असा सुद्धा एक प्रकार असतो. कोहिनूर किंवा MTR सारख्या कंपन्या अशा पद्धतीचं इन्स्टंट फूड उपलब्ध करून देतायत. हे फक्त आपल्याला गरम करायचं असतं. यात उपमा सुद्धा येतो बरं का. सगळं बॅटर यात असतं आपण फक्त त्यात गरम पाणी टाकायचं आणि उपमा रेडी तो ईट!

फ्रोजन स्नॅक्स: कॉर्न, टेस्टी बाईट, सामोसा, स्प्रिंग रोल, आलू टिक्की, नगेट्स असे इन्स्टंट फ्रोजन स्नॅक्स बाजारात उपलब्ध आहेत. हे फ्रिज मध्ये स्टोअर करून हवे तेव्हा आपण पटकन बनवून खाऊ शकतो. इन्स्टंट फूड फास्ट आयुष्यात खूप कामी येतात.

इन्स्टंट मिक्स: इडली, डोसा, ढोकळा, उपमा, टोमॅटो ऑम्लेट असे अनेक बॅटर एका पॅकेट मध्ये येतात. हे बटर पॅकेट मधून बाहेर काढलं की फक्त तव्यावर टाकायचं. आपण सगळं बनवण्यात वेळ घालवतो त्या ऐवजी हे इन्स्टंट मिक्स कधीही परवडतात.