
Internet Ownership: जगभरातच नाही तर भारतातही इंटरनेटचा वापर करणाऱ्यांची संख्या झपाट्यानं वाढत आहे. पण इंटरनेटचं मालक कोण आहे हे तुम्हाला माहिती आहे का? केबल्स, कंपन्या, डाटा सेंटर यांची मोठी चेन आहे. कोण आहे इंटरनेटचा मालक, याची अनेकांना उत्सुकता आहे.

इंटरनेट कोणत्याही सरकारी अथवा कंपनीच्या मालकीचे नाही. हे हजारो छोट्या नेटवर्कपासून तयार होणारे एक ग्लोबल नेटवर्क आहे. हे सर्व केबल जोडण्यात आले आहे. प्रत्येक भाग हा केबल्स, सर्व्हर, नेटवर्क याची मालकी आहे. म्हणजे इंटरनेटचा कोणी एक मालक नाही. तर त्या त्या कंपन्याचे काही जण मालक आहेत.

इंटरनेटच्या मालकीत सर्वात उंचीवर टियर 1 नेटवर्क प्रोव्हाइडर्स असते. या कंपन्या समुद्राच्या तळातून फायबर ऑपटिकलचे जाळे विणतात. हे जाळे मग विविध देशांपर्यंत जाऊन तिथे इंटरनेट पोहचवले जाते. या कंपन्या मध्यस्थीविना थेट एकमेकांना सहकार्य करतात. या मोठ्या कंपन्यांमध्ये टाटा कम्युनिकेशन्स, गुगल, मेटा, मायक्रोसॉफ्ट आणि इतर कंपन्या आहेत.

टियर 2 प्रोव्हाइडर्स टियर 1 नेटवर्ककडून बँडविथ खरेदी करतात. त्यानंतर ते सर्वत्र पसरवतात. विविध देशात असे सर्व्हिस प्रोव्हाइडर असतात. भारतात रिलायन्स जिओ, भारतीय एअरटेल,व्होडाफोन आयडिया, बीएसएनएल सारख्या कंपन्या नेटवर्क विस्ताराचे काम करतात आणि त्यामुळे आपल्या मोबाईलमध्ये इंटरनेट धावते.

तर इंटरनेट प्रत्येक शहर, गावात टियर 3 इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हाइडर्सच्यामार्फत युझर्सपर्यंत पोहचते. याठिकाणी स्थानिक ऑपरेटर असतात.ते टियर 2 कंपन्यांकडून हे कनेक्टिव्हिटी खरेदी करतात. फायबर, केबल वा वायरलेस नेटवर्कच्यामाध्यमातून वितरणाचे हक्क ते मिळवतात.

इंटरनेट हे पाणबुडी फायबर ऑप्टिक केबलने सुरु होते. जगभरात या पद्धतीने जवळपास 99% इंटरनेट पोहचवल्या जाते. हे केबल अनेक खंडाना जोडते. तर किनाऱ्यावरील लँडिंग स्टेशनवरुन ते त्या त्या देशात पसरवले जाते. भारतात असे लँडिंग पॉईंट्स हे मुंबई, चेन्नई आणि कोच्ची या शहरात आहेत. आता या सर्वांसमोर एलॉन मस्क यांची स्पेसएक्स ही कंपनी आव्हान उभं करू पाहत आहे.