Post Office ची सर्वात जबरदस्त स्कीम, एकदा पैसा लावा…नंतर दर महिन्याला 5550 रुपयांची कमाई
तुम्हाला सुरक्षित जागी पैसे लावायचे असतील, हे पैसे सुरक्षित राहून त्यावर महिन्याला इन्कम देखील मिळावे अशी इच्छा आहे. तर ही बातमी तुमच्यासाठी खास आहे. पोस्ट ऑफीसची स्मॉल सेव्हींग स्कीम तुमच्या कामी येऊ शकतो. यात पोस्ट ऑफीस इन्कम स्कीम (Post Office Monthly Income Scheme) यात एकदा गुंतवणूक केल्यानंतर दर महिन्याला रेग्युलर इन्कमची गॅरंटी मिळते.

पोस्ट ऑफिसद्वारा संचालित स्मॉल सेव्हींग स्कीमच्या प्रसिद्धीला कारण म्हणजे यातील छोट्या रकमेलाही सरकार स्वत: गॅरंटी देते. याचा अर्थ ही Post Office Schemes ही एकदम झिरो रिस्क स्कीम आहे.

पोस्ट ऑफिस एमआयएस स्कीम (Post Office MIS Scheme) खासकर करुन निवृत्तांसाठी आहे. निवृत्तीनंतर कोणतीही रिस्क नसलेली ही योजना तुम्हाला मासिक उत्पन्न देत. रिटायरमेंटनंतर एक मोठी रक्कम जमा करण्यासाठी लॉक इन पिरियडपर्यंत निश्चित रक्कम गुंतवणूकीस मिळत रहाते.

मंथली सेव्हिंग स्कीम अंतर्गत ७.४ टक्के वार्षिक व्याज मिळते आणि गुंतवणूकीवर मिळणारे व्याजाचे पेमेंट मासिक तत्वांवर मिळू शकते. त्यामुळे दर महिन्यासाठी कमाई पक्की होते. या सरकारी स्कीममध्ये केवळ १००० रुपयांच्या सुरुवातीच्या गुंतवणूकीसोबत अकाऊंट खोलता येऊ शकते. यात जॉइंट खाते उघडण्याची सुविधा देखील दिली जाते.

Post Office च्या मासिक इन्कमची गॅरंटी देणाऱ्या या MIS स्कीममध्ये कमाल आणि किमान गुंतवणूकीची मर्यादा सेट केली आहे. याअंतर्गत एक व्यक्ती एक ठराविक सिंगल अकाऊंटमध्ये ९ लाख रुपये जमा करता येऊ शकतात. याशिवाय जर जॉईंट खाते खोलले असेल तर यात कमाल १५ लाख रुपयांची गुंतवणूक एकदाच करता येते. यानंतर व्याजावर होणारी कमाई तुम्हाला मिळणे सुरु होते. या स्कीममध्ये मॅच्युरिटी पिरियड ५ वर्षांचा आहे.

पोस्ट ऑफिसच्या या स्कीममध्ये दर महिन्याला होणाऱ्या कमाईचा कॅलक्युलेशन खूपच सोपे आहे. Post Office MIS Calculator ची गणना केली तर दर एखाद्या गुंतवणूकदाराने जॉईंट अकाऊंट खोलून या स्कीममध्ये एक रकमी १५ लाख रुपये जमा केले. तर ७.४ टक्के च्या हिशेबाने मासिक पाच वर्षांपर्यंत ९,२५० रुपये मिळतील. तर कोणी सिंगल खात्यात एकदाच कमाल ९ लाख रुपये गुंतवले, तर मासिक रक्कम ५,५५० रुपये मिळतील.

पोस्ट ऑफिस मासिक इन्कम स्कीममध्ये व्याजाने होणारी कमाई मासिक, तिमाही, सहामाही वा वार्षिक सुद्धा घेता येते. मात्र हे लक्षात घ्या संपूर्ण फायदा मॅच्युरिटीपर्यंत ही स्कीम चालवण्यावरच मिळतो. या अतंर्गत निश्चित सरकारी नियम (Post Office Saving Scheme Rules) पाहिले, तर खाते उघडल्यानंतर १ ते ३ वर्षात क्लोज केले तर मुळ रक्कम २ टक्के कापली जाते. तर तीन ते पाच वर्षांत खाते क्लोज केल्यानंतर १ टक्के रक्कम कापली जाते.