
आयपीएलच्या 14 व्या मोसमातील 13 वा सामना मंगळवारी 20 एप्रिल दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात रंगणार आहे. दोन्ही संघांसाठी हा सामना महत्वाचा असणार आहे.

उभयसंघ आतापर्यंत 28 सामन्यात आमनेसामने भिडले आहेत. यामध्ये मुंबई वरचढ राहिली आहे. मुंबईने 16 सामन्यात विजय मिळवला आहे. तर दिल्लीने 12 वेळा मुंबईचा पराभव केला आहे.

13 व्या मोसमापर्यंत दोन्ही संघ तुल्यबळ होते. गत मोसमात हे दोन्ही संघांचा एकूण 4 वेळा आमनासामना झाला. यामध्ये मुंबईने दिल्लीवर मात केली. या 4 पैकी 2 सामने हे साखळी फेरीतील होते. तर उर्वरित 2 सामन्यांमध्ये हे क्वालिफायर आणि फायनल मॅचचा समावेश होता. मुंबईने दिल्लीला पराभूत करत पाचव्यांदा विजेतेपद पटकावलं होतं.

फलंदाजी आणि गोलंदाजीच्या बाबतीतही मुंबई दिल्लीपेक्षा सरस आहे. दोन्ही संघांमधून मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने सर्वाधिक धावा फटकावल्या आहेत. रोहितने 2011 पासून दिल्ली विरुद्ध 633 धावा केल्या आहेत.

तसेच गोलंदाजीच्या बाबतीतही मुंबईचाच बोलबाला आहे. यॉर्कर किंग जसप्रीत बुमराहने सर्वाधिक 18 विकेट्स घेतल्या आहेत.