
आयपीएलच्या 14 व्या मोसमात आज मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद यांच्यात लढत रंगणार आहे. या सामन्यात 4 खेळाडूंची कामगिरी निर्णायक ठरणार आहे. ही चौकडी कशी कामगिरी करते, यावर सामन्याचा निकाल अवलंबून असणार आहे. या निमित्ताने आपण हे 4 खेळाडू कोणते आहेत आणि त्यांची कामगिरी कशी आहे हे पाहणार आहोत.

आयपीएलमध्ये उभयसंघ आतापर्यंत एकूण 16 वेळा आमनेसामने भिडले आहेत. दोन्ही संघांनी प्रत्येकी 8 सामन्यात विजय मिळवला आहे. त्यामुळे दोन्ही टीम तुल्यबळ आहेत.

या दोन्ही संघांनी भारतात एकूण 13 मॅचेस खेळल्या आहेत. यातील 7 सामन्यात मुंबईने विजय मिळवला आहे. तर 6 मॅचेसमध्ये हैदराबादने मुंबईवर मात केली आहे.

मुंबईकडून हैदराबाद विरुद्ध अष्टपैलू खेळाडू कायरन पोलार्डने सर्वाधिक 383 धावा केल्या आहेत. तर विकेट्सच्या बाबतीत जसप्रीत बुमराह अव्वल क्रमांकावर आहे. बुमराहने हैदराबादच्या 12 फंलदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला आहे.

मुंबई विरुद्ध हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने सर्वात जास्त धावा केल्या आहेत. वॉर्नरने हैदराबादकडून मुंबई विरुद्ध 488 धावा फटकावल्या आहेत. तर भुवनेश्वर कुमारने 16 विकेट्स मिळवल्या आहेत.

क्रिकेटमध्ये कॅचेस विन मॅचेस असं म्हटलं जातं. पोलार्डने हैदराबाद विरुद्ध सर्वाधिक धावा करण्यासोबत जास्त कॅचेस घेतल्या आहेत. पोलार्डने हैदराबाद विरुद्ध एकूण 11 झेल घेतल्या आहेत. तर भुवनेश्वर कुमारने मुंबईच्या 4 फलंदाजांच्या कॅच टिपल्या आहेत.