
रॉयल चॅलेंजर्स बँगलोरने (RCB) आपल्या टीमचा स्टार खेळाडू ग्लेन मॅक्सवेलसाठी लग्नाची पार्टी (Glen maxwell Wedding party) आयोजित केली होती.

या पार्टीमध्ये टीमचा माजी कर्णधार विराट कोहलीसह अन्य खेळाडूंनी भरपूर मजा-मस्ती केली.

विराट कोहली पत्नी अनुष्का शर्मासह (Anushka Sharma) ग्लेन मॅक्सवेलच्या लग्नाच्या रिसेप्शन पार्टीला हजर होता.

ऑस्ट्रेलियाचा ऑलराऊंडर ग्लेन मॅक्सवेलने भारतीय वंशाच्या विन्नी रमनसह मागच्या महिन्यात 27 मार्चला तामिळ पद्धतीने लग्न केलं. 27 एप्रिलला त्यांच्या लग्नाला एक महिना पूर्ण झाला.

या पार्टीत गाजलेल्या 'पुष्पा' सिनेमातील 'ओ अन्तवा' गाणं वाजवण्यात आलं. या गाण्यावर विराटसह आरसीबीच्या खेळाडूंनी ठेका धरला.

या पार्टीला आरसीबीचा कॅप्टन फाफ डू प्लेसिस कुटुंबासह पोहोचला होता. डू प्लेसिस आणि त्याच्या पत्नीने भारतीय पद्धतीचा पेहराव केला होता. डू प्लेसिसने सदरा-लेंगा तर त्याच्या पत्नीने साडी नेसली होती.

पार्टीतील काही व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. RCB च्या खेळाडूंनी खूप धमाल, मजा-मस्ती केली.

रॉयल चॅलेंजर्स बँगलोरकडून खेळणारा मॅक्सवेल 2017 पासून विनी रमनला डेट करत होता. दोघांनी काही दिवसांपूर्वीच लग्न केलं होतं.

विनी रमन भारतीय वंशाची तामिळ मुलगी आहे. चार-पाच वर्षांपासून सुरु असलेलं हे प्रेम आता विवाहबंधनात अडकलं आहे.

. विराट-अनुष्काच्या लुकचीही भरपूर चर्चा होत आहे. विराटने काळ्या रंगाचा कुर्ता आणि सफेद पायजमा परिधान केला होता.