IPL 2023 : केकेआरच्या फलंदाजाची कमाल, 41 चेंडूत 83 धावा आणि वेगवान अर्धशतकाचा मान

| Updated on: Mar 29, 2023 | 5:29 PM

आयपीएल स्पर्धा सुरु होण्यासाठी आता काही तासांचा अवधी शिल्लक आहे. अशात प्लेईंग 11 मध्ये कोण खेळणार? याबाबत रणनिती आखली जात आहे. पण कोलकात्याला कमी पैशात जबरदस्त फॉर्मात असलेला फलंदाज सापडला आहे. नुकतंच त्याने वेगवान अर्धशतक ठोकलं आहे.

1 / 5
IPL 2023  स्पर्धेसाठी सर्व संघ सज्ज झाले आहेत. असं असलं तरी काही संघांना खेळाडूंच्या दुखापतीमुळे जबदस्त फटका बसला आहे. तर काही खेळाडू स्पर्धेपूर्वी जबरदस्त फॉर्ममध्ये दिसत आहेत. कोलकाता नाईट रायडर्स संघात घेतलेला यष्टीरक्षक-फलंदाज लिटन दास सध्या चांगल्या लयीत आहे. (Photo - PTI)

2 / 5
बांगलादेशचा स्टार फलंदाज लिटन दास गेल्या काही महिन्यांपासून जबरदस्त फॉर्मात आहे. 29 मार्च रोजी चट्टोग्राम येथे खेळलेल्या सामन्यात लिटनने जबरदस्त फलंदाजीकेली. लिटनने आयर्लंडविरुद्ध झंझावाती अर्धशतक ठोकलं. (Photo - AFP)

3 / 5
आयपीएल आधी खेळल्या जात असलेल्या टी-२० मालिकेतील दुसऱ्या सामन्यात लिटनने अवघ्या 18 चेंडूत अर्धशतक ठोकले. बांगलादेशसाठी या फॉरमॅटमधील सर्वात जलद अर्धशतक करण्याचा नवा विक्रम आहे. यादरम्यान लिटनने 41 चेंडूंत 10 चौकार आणि 3 षटकारांसह 83 धावा ठोकल्या. (Photo - AFP)

4 / 5
लिटन सातत्याने आक्रमक फलंदाजी करत आहे. पहिल्या T20 मध्ये त्याने 23 चेंडूत 47 धावा केल्या होत्या. याआधी त्याने एकदिवसीय मालिकेतही दोन अर्धशतके झळकावली होती. त्याचवेळी, इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-20मध्ये लिटनने 73 धावा केल्या. (Photo - AFP)

5 / 5
आयपीएल लिलावात केकेआरने 28 वर्षीय यष्टीरक्षक-फलंदाजला 50 लाख रुपयांच्या बेस प्राईसमध्ये खरेदी केले होते. लिटन दास पहिल्यांदाच आयपीएलमध्ये खेळताना दिसणार आहे. (Photo - AFP)