IPL 2026 Auction आधी 97 कोटींचे खेळाडू होणार बाहेर, या टीममधील सर्वाधिक स्टार्स होणार OUT

IPL 2026 सीजनआधी यंदा मिनी ऑक्शन होईल. डिसेंबर महिन्यात हे ऑक्शन पार पडेल. या ऑक्शनसाठी खेळाडूंना रिटेन आणि रिलीज करण्याची शेवटची तारीख 15 नोव्हेंबर असू शकते.

| Updated on: Oct 11, 2025 | 2:02 PM
1 / 5
IPL 2026 सीजनला अजून 6 महिने बाकी आहेत. त्याआधी नव्या सीजनसाठी लिलाव होणार आहे. पुढच्या दोन महिन्यात हा लिलाव होईल. एका रिपोर्टनुसार मिनी ऑक्शन 15 ते 17 डिसेंबर दरम्यान होऊ शकते. 15 नोव्हेंबर रिटेंशन लिस्ट जारी करण्याची डेडलाइन आहे. प्राथमिक रिपोर्टनुसार, ज्या खेळाडूंची एकूण किंमत 97.35 कोटी येते, त्या सर्व  खेळाडूंना रिलीज केलं जाऊ शकतं.  (Photo: PTI)

2 / 5
क्रिकबजच्या एका रिपोर्टनुसार पाचवेळची चॅम्पियन चेन्नई सुपर किंग्स कमीत कमी पाच खेळाडूंना रिलीज करु शकते. यात डेवन कॉनवे (6.25 कोटी), दीपक हुड्डा (1.70 कोटी), विजय शंकर (1.20 कोटी), राहुल त्रिपाठी (3.40 कोटी) आणि सॅम करन (2.40 कोटी) असे मोठे खेळाडू आहेत. (Photo: PTI)

3 / 5
 ऋषभ पंतच्या नेतृत्वाखालील लखनऊ सुपर जायंट्सकडून सुद्धा काही महागडे खेळाडू रिलीज केले जाऊ शकतात. रिपोर्टनुसार, आकाश दीप (8 कोटी) आणि डेविड मिलर (7.50 कोटी) अशी मोठी नावं आहेत. वेगवान गोलंदाजीने खळबळ उडवून देणारा मयंक यादव (11 कोटी ) यांना रिलीज केलं जाऊ शकतं.  (Photo: PTI)

4 / 5
दिल्ली कॅपिटल्सची टीम सुद्धा काही मोठे निर्णय घेऊ शकते. ते आपल्या दोन गोलंदाजांना रिलीज करु शकतात. त्यांच्यावर 22 कोटी पेक्षा जास्त खर्च केलेत. यात ऑस्ट्रेलियाचा दिग्गज वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क (11.75 कोटी) हे महत्त्वाच नाव आहे. त्याशिवाय डावखुरा वेगवान गोलंदाज भारतीय पेसर टी नटराजन (10.75 कोटी) या दोघांना रिलीज केलं जाऊ शकतं.  (Photo: PTI)

5 / 5
मागच्या मेगा ऑक्शनमधील सर्वात महागडा खेळाडू वेंकटेश अय्यरला सुद्धा रिलीज केलं जाऊ शकतं.  कोलकाता नाइट रायडर्सने त्याला 23.75 कोटीच्या मोठ्या किंमतीला विकत घेतलं होतं. लीगच्या इतिहासातील तो तिसरा सर्वात महागडा खेळाडू आहे. त्याचं प्रदर्शन अपेक्षेनुसार नव्हतं. त्यामुळे त्याला रिलीज केलं जाऊ शकतं.  (Photo: PTI)