आयपीएलमधील भन्नाट रेकॉर्ड! ख्रिस गेल, मुंबई इंडियन्सच्या नावावर षटकारांचा असा विक्रम

| Updated on: Mar 31, 2023 | 5:22 PM

आयपीएल म्हटलं की चौकार आणि षटकारांचा पाऊस..फलंदाजांचा आक्रमक अंदाज पाहून चांगल्या गोलंदाजांना घाम फुटतो. आतापर्यंत झालेल्या 15 पर्वात षटकरांचा बादशाह कोण आहे? जाणून घ्या..

1 / 7
आयपीएल 2023 स्पर्धा सुरु झाली असून षटकारांच्या वर्षावाकडे क्रीडाप्रेमींची लक्ष लागून आहे. गेल्या 15 सिझनमध्ये षटकारांचा नुसता पाऊस पडला आहे. सर्वाधिक षटकार मारणारा खेळाडू, संघ यांची नुसती चढाओढ सुरु आहे.

2 / 7
मुंबई इंडियन्सने आयपीएलच्या 5 जेतेपदांवर नाव कोरलं आहे. तसेच सर्वाधिक षटकार या संघाच्या नावावर आहेत. या संघात रोहित शर्मा, कायरन पोलार्ड, हार्दिक पांड्या खेळाला आहे.

3 / 7
आयपीएलच नाही संपूर्ण जगात ख्रिस गेलची नावलौकिक सिक्सर किंग म्हणून आहे. षटकारांच्या यादीत ख्रिस गेल अव्वल स्थानी आहे. आरसीबी, केकेआर आणि पंजाबसाठी त्यांनी षटकारांचा वर्षाव केला आहे.

4 / 7
ख्रिस गेलने एका सामन्यात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम केला आहे. हा विक्रम त्याने 2013 मध्ये केला आहे. पुणे वॉरियर्स विरुद्ध 175 धावांची विक्रमी खेळी केली होती.

5 / 7
एका पर्वात सर्वाधिक षटकार ठोकण्याचा विक्रमही ख्रिस गेलच्या नावावर आहे. 50 पेक्षा जास्त षटकार त्याने दोन पर्वात ठोकले आहेत. 2012 मध्ये त्याने 59 षटकार मारले होते.

6 / 7
सर्वात लांब षटकार मारण्याचा विक्रम दक्षिण आफ्रिकेच्या एल्बी मॉर्केलच्या नावावर आहे. त्याने चेन्नई सुपर किंग्सकडून खेळताना 125 मीटर लांब षटकार मालला होता. यात त्याने ख्रिस गेललाही मागे सोडलं.

7 / 7
एका षटकात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम तीन खेळाडूंच्या नावावर आहे. तिघांनी एका षटकात प्रत्येकी पाच षटकार मारले आहेत. गेलने 2012 मध्ये पुणे वॉरियर्स विरुद्ध राहुल शर्माला 5 षटकार ठोकले होते. 2020 मध्ये राहुल तेवतियाने पंजाबच्या शेल्डन कॉटरेला आणि 2021 मध्ये जडेजाने आरसीबीच्या हर्षल पटेलला 5 षटकार मारले होते.