Success Story : 16 सरकारी नोकऱ्या सोडल्या, पहिल्याच प्रयत्नात थेट आयपीएस, तृप्ती भट्ट नेमक्या कोण?

इंजिनिअरिंगनंतर तृप्ती अनेक सरकारी स्पर्धा परीक्षांमध्ये उत्तीर्ण झाल्या. त्यांना ISROमध्ये सायन्टिस्ट- इंजिनिअर पदावर काम करण्याचीही संधी मिळाली होती. याशिवाय NTPCसह इतर सरकारी संस्थांकडूनही त्यांना नोकरीच्या ऑफर्स मिळाल्या.

| Updated on: Sep 24, 2026 | 6:33 PM
1 / 5
उत्तराखंडच्या अल्मोडा जिल्ह्यातील तृप्ती भट्ट यांचा जन्म शिक्षकाच्या कुटुंबात झाला. अभ्यासात हुशार असलेल्या तृप्ती यांनी विद्यापीठातून मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये B.Tech चे शिक्षण पूर्ण केले. लहानपणापासूनच त्यांना सरकारी सेवेत जाण्याची इच्छा होती. याच ध्येयासाठी त्यांनी विविध स्पर्धा परीक्षांची तयारी सुरू केली.

2 / 5

इंजिनिअरिंगनंतर तृप्ती अनेक सरकारी स्पर्धा परीक्षांमध्ये उत्तीर्ण झाल्या. त्यांना ISROमध्ये सायन्टिस्ट- इंजिनिअर पदावर काम करण्याचीही संधी मिळाली होती. याशिवाय NTPCसह इतर सरकारी संस्थांकडूनही त्यांना नोकरीच्या ऑफर्स मिळाल्या.

3 / 5

मात्र त्यांचे अंतिम ध्येय UPSCच्या माध्यमातून नागरी सेवेत जाण्याचे होते. ISROसारख्या प्रतिष्ठित संस्थेत काम करण्याची संधी मिळूनही तृप्ती यांनी ती स्वीकारली नाही. थेट जनतेसोबत काम करण्याची आणि समाजासाठी योगदान देण्याची त्यांची इच्छा होती.

4 / 5

त्यामुळे त्यांनी UPSCच्या तयारीवर लक्ष केंद्रित केले. करिअरच्या स्थिर पर्यायापेक्षा त्यांनी आपल्या दीर्घकालीन ध्येयाला प्राधान्य दिले. तृप्ती यांनी 2013 मध्ये पहिल्यांदाच UPSC नागरी सेवा परीक्षा दिली.

5 / 5

प्रीलिम्स, मेन्स आणि मुलाखत असे सर्व टप्पे त्यांनी यशस्वीपणे पार केले. अंतिम यादीत त्यांनी गुणवत्ता यादीत 168 वा क्रमांक मिळवला. यानंतर त्यांची भारतीय पोलीस सेवेसाठी (IPS) निवड झाली आणि त्यांना उत्तराखंड केडर मिळाले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us